COVID-19 Goa: गोव्यात कोरोनामुळे 7 मुलांचा मृत्यू

COVID-19 Goa
COVID-19 Goa

पणजी : गोवा राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 18 वर्षाखालील 7 मुलांचा   मृत्यू  झाला आहे. तर  काल पर्यंत 1 लाख 50 हजार 9897 कोरोना बाधीत झाले. आणि 1 लाख 32 हजार 607बरे झाले.  यात  18 वर्षाखालील 16246 मुलांचा समावेश आहे.  राज्यात 18 वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे.   मात्र त्याखालील मुलांना नाही. राज्यात 18 वर्षाखालील 7 मुलासह आतापर्यंत 2499 कोरोना बाधीत दगावले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोन दिवसापूर्वी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 18 वर्षाखालील सात मुलांचे  कोरोनामुळे जे  मृत्यू झाले त्याला सदर मुलांना असलेले सलग्न आजार , कोमोर्बिड कंडीशन  हेही एक कारण आहे.(COVID-19 7 children died in goa)

राज्यात 45  वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण गेल्या चार महिन्यापासून सुरू आहे . तर 18  ते 44 वयोगटातील  नागरिकांना गेल्या आठवड्यात लसीकरण सुरु झाले आहे. 45 वर्षावरील 4,92,695   नागरिकांनी लस घेतली.  तर 18 ते 44 वयोगटातील 30 हजार नागरिकांनी लस घेतली आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार 18 वर्षाखालील मुलांना अद्याप लसीकरण  सुरू झालेले नाही.

याबाबत स्पष्टीकरण देताना गोवा राज्याचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण उपक्रमाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी सांगितले की देशांमधील विविध राज्यांमध्ये जे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे ते केंद्र सरकारच्या नियमानुसार सुरू आहे. केंद्र सरकारची टास्क फोर्स जी नियमावली ठरवते त्यानुसार लसीकरण केले जाते. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस, सुरक्षा रक्षक व कोरोना नियंत्रणाच्या कामात सक्रिय असलेले आधिकारी या  कोविड योध्याना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर  60 वर्षावरील नागरिक व 45  वर्षावरील आजारी नागरिकांना लसीकरण करण्यात आले.  तिसऱ्या  टप्प्यात 45 वर्षावरील सरसकट सर्वच नागरिकांना लसीकरण करण्यात येत असून अद्याप सरकारकडे  सुमारे 2 लाख 80 हजार लसींचा साठा उपलब्ध आहे.

ज्यावेळी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण देण्याची मुभा केंद्र सरकारने  राज्याला दिली. त्यावेळी  गोवा सरकारने या गटातील नागरिकांना देण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांच्याकडे कोविशिल्डच्या पाच लाख लसींची मागणी नोंदविली होती. मात्र त्यांच्याकडून 32740 एवढेच डोस उपलब्ध  केले गेले. ते डोस  ऑनलाइन नोंदणी करून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना देण्यात आले. आता त्यातील अडीच हजार डोस उपलब्ध असून हे डोस 18 ते 44 वयोगटातील जे फ्रन्टलाइन वर्कर्स आहेत त्यांना देण्यासाठी ठेवण्यात आल्याचे डॉ. बोरकर यांनी सांगितले. 

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना देण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट कडून 36 हजार 580 लसीचे डोस गोव्याला उपलब्ध होणार आहेत.  त्यानंतर थेट नोंदणी करून  लसीकरण केले जाणार असल्याचे डॉ. बोरकर यांनी सांगितले. राज्यातील शंभर टक्के नागरिकांना लसीकरण करण्याचे गोवा सरकारचे ध्येय आहे. मात्र केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार हे लसीकरण करावे लागते.45 वर्षावरील नागरिकांना गेले चार महिने लसीकरण सुरू असूनही अद्यापही हजारो नागरिकांनी लस उपलब्ध असतानाही ती घेतली नाहीय. कालपासून आयोजित टीका उत्सवाद्वारे 168 जागी  लसीकरण सुरू  केल्याचे डॉ. बोरकर यांनी सांगितले.

दरम्यान गोव्यात अठरा वर्षाखालील ज्या सात मुलांचा मृत्यू कोरोनामुळे झाला त्यांना कोरोना सोबत इतर सलग्न आजार होते. हे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. डॉ. बोरकर यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. सदर मुलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना असलेल्या इतर आजाराचा फटका त्यांना बसला आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. बोरकर यांनी सांगितले. गोव्यात केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार लसीकरण होत आहे. 18 वर्षाखालील मुलांना लस देण्याची परवानगी केंद्राने दिल्यास गोवा सरकार  त्याची अंमलबजावणी करून लसीकरण सुरू करील. असे  डॉ. बोरकर यांनी  शेवटी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com