GOA COVID-19: गोवा देशात 'टॉप'ला; ग्रामीण भागात कोरोनाचा कहर

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 7 मे 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गोव्याच्या ग्रामीण भागांना जोरदार तडाखा दिलेला असून या परिसरांमध्ये कोरोनाने खोलवर प्रवेश केलेला असल्याचे दिसून आलेले आहे. यात डिचोली, कुठ्ठाळी, केरी, धारगळ, प्रियोळ आणि शेल्डे यासारखे ग्रामीण भाग नवे हॉटस्पॉट म्हणून उदयाला आलेले आहेत.

पणजी: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गोव्याच्या(GOA) ग्रामीण(Village) भागांना जोरदार तडाखा दिलेला असून या परिसरांमध्ये कोरोनाने(Corona) खोलवर प्रवेश केलेला असल्याचे दिसून आलेले आहे. यात डिचोली, कुठ्ठाळी, केरी, धारगळ, प्रियोळ आणि शेल्डे(Bicholim,Cuncolim) यासारखे ग्रामीण भाग नवे हॉटस्पॉट(Hotspot)म्हणून उदयाला आलेले आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या ''प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन'' विभागाने केलेल्या अभ्यासात ही बाब दिसून आलेली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेले आहेत, असे या अभ्यासातून समोर आले आहे.(COVID 19 Goa ranks first in the country Corona hit hard in rural areas)

राज्य सरकारने गोव्याची सुरक्षित पर्यटनस्थळ अशी ओळख संपवली 

या अभ्यासाचा अहवाल सरकारला सादर करण्यात आलेला असून त्यात केरी, धारगळ, पेडणे, शिरदोण, हळदोणे, खांडेपार, दोडामार्ग, कुडणे, प्रियोळ, आगोंद आणि शेल्डे येथील अधिकाधिक नागरिकांमध्ये कोरोनाच्या संसर्गाची लक्षणे दिसून यायला लागली आहेत, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. हे भाग खूप धोकादायक असून त्यांची तत्काळ छाननी होण्याची गरज आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

Vaccination: गोव्यात काल 4444 जणांचे लसीकरण; राज्याकडे आता दिड लाख डोस शिल्लक 

कोरोनाची ची बाधा झाल्याचे निश्चित झालेले रुग्ण, चाचणीसाठी आलेले संशयित रुग्ण आणि आरोग्य सेतू ॲपवर ज्यांनी आपली लक्षणे मांडलेली आहेत असे संशयित रुग्ण यांच्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे. ‘प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन’ विभागाचे प्रमुख डॉ. जगदीश काकोडकर यांनी डॉ. नितीन धुपदळे आणि डॉ. धन्या जुझे यांच्यासमवेत हा आरोग्य सेतू विश्लेषण अहवाल तयार केलेला आहे. त्यांनी संपूर्ण माहितीचे विश्लेषण करून हा अहवाल राज्य सरकारला सादर केलेला आहे.

हॉटस्पॉटमध्ये झपाट्याने वाढ
या अहवालानुसार, 1 मे रोजी हॉटस्पॉटची संख्या 169 होती, ती 3 मे रोजी 192 वर आणि नंतर 206 वर पोहोचली. उत्तर गोव्यातील सर्वांत धोकादायक भाग या स्थानावर कळंगुट कायम असून डिचोली, बांबोळी, सांत इनेज आणि पर्वरी यांना त्याच्या मागोमाग स्थाने प्राप्त झालेली आहेत. दक्षिणेत फातोर्डा हा पहिल्या स्थानावर असलेला हॉटस्पॉट असून त्याच्या मागोमाग कुडचडे, कुठ्ठाळी, घोगळ आणि नागोवा यांना स्थान मिळाले आहे. डिचोली औद्योगिक वसाहत ही हॉटस्पॉट म्हणून उदयाला आलेली असून कित्येक औद्योगिक कामगारांना या विषाणूची बाधा झाल्याची माहिती मिळालेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे देशी पर्यटकांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागल्यावर उत्तर गोव्यातील काही किनारपट्टी भाग अत्यंत धोकादायक भागांच्या यादीतून बाहेर गेले आहेत. एप्रिलमध्ये तयार करण्यात आलेल्या अशाच प्रकारच्या अहवालामध्ये बागा, कळंगुट आणि हणजूण यांचा गोव्यातील अग्रणी हॉटस्पॉट म्हणून उल्लेख करण्यात आला होता.

संबंधित बातम्या