Goa Board Exam: परीक्षा रद्द म्हणजे उत्तीर्ण नव्हे...

Exam Cancelled.jpg
Exam Cancelled.jpg

पणजी: गोवा (Goa) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सरकारच्या निर्णयानंतर दहावीची यंदाची परीक्षा रद्द केली (10th Exam Cancelled) आहे. असे असले तरी परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी उत्तीर्ण (Pass) व अनुत्तीर्ण (Fail) ठरवण्यासाठी निकष ठरवण्यात येणार आहेत. यामुळे परीक्षा रद्द याचा अर्थ सगळे विद्यार्थी उत्तीर्ण या संकल्पनेस धक्का बसणार आहे. (Criteria will definitely be set for passing and failing.)

मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेटये यांना विचारले असता ते म्हणाले, सरसकट सगळेचजण उत्तीर्ण असे होणार नाही. उत्तीर्ण व अनुत्तीर्ण ठरवण्यासाठी निश्चितपणे निकष ठरवले जातील. त्यासाठी पाच सदस्यांचा समावेश असलेली प्रत्येक विषयासाठी एक अशी समिती नेमावी लागणार आहे. त्या समितीत विषय शिक्षकांचाही समावेश असेल. त्या समित्या बैठका घेऊन उत्तीर्ण होण्यासाठी  निकष निश्चित करणार आहेत. या प्रक्रियेला एक महिनाही लागू शकतो.

या विषयावर शिक्षणमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी मंडळाची भूमिका समजावून घेतली. केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीनंतर राज्याचे म्हणणे लेखी स्वरूपात पाठवून द्या असेही सांगितले गेले होते. त्यावरही अंतिम हात आज फिरवण्यात आला. 

दहावीची परीक्षा रद्द याचा अर्थ सर्व उत्तीर्ण असा नाही असेही आज स्पष्ट करण्यात आले आहे. उत्तीर्ण होण्यासाठीचे निकष अद्याप ठरवले जाणे बाकी आहे. त्यानंतरच उत्तीर्ण व अनुत्तीर्णचा निकाल जाहीर होणार आहे. मंडळ सध्या त्या निकालाची तयारी करण्याची पूर्वतयारी करत असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com