Good Friday 2021: गोव्यात गुड फ्रायडेनिमित्त चर्चमध्ये भक्तांची गर्दी 

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरवात झाली आहे. केंद्र सरकारसह राज्यसरकारांनी देखील खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. अनेक सण उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे.

गोवा : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरवात झाली आहे. केंद्र सरकारसह राज्यसरकारांनी देखील खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. अनेक सण उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक स्थळेदेखील बंद करण्यात आली आहेत. मात्र गोव्याची राजधानी असलेल्या पणजीतील इमाक्युलेट कॉन्सेप्ट चर्चमध्ये काही वेगळेच चित्र दिसत आहे. कोरोनाने देशभरात चिंतेचे वातावरण असताना गोव्यातील नागरिकांनी गुड फ्रायडेची तयार केली आहे.  गोव्यातील  चर्च जगभरात प्रसिद्ध आहेत. अशातच गुड फ्रायडेच्या निमित्ताने भक्तांनी चर्चमध्ये जाण्याला प्राधान्य दिले आहे. 

गोव्याच्या क्लबमध्ये राखीने लगावले 'परदेसीया' वर भन्नाट ठुमके; पहा...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पणजीतील  इमाक्युलेट कॉन्सेप्ट चर्चमध्ये भव्य लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. चर्च प्रशासनाने देखील सर्व खबरदारीच्या उपाययोजना याठिकाणी राबलेल्या दिसत आहेत. चर्चच्या प्रवेशद्वारापाशी टेंपलेस हँड सॅनिटायझर आणि  टेंपरेचर गनने येणाऱ्या भक्तांची तपासणी केली जात आहे. गुड फ्रायडेनिमित्त चर्चमध्ये अनेक भक्त येत असतात. मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोना साथीमुळे लोकांनी सर्व सण घरीच साजरे केले. मात्र यावेळी कोरोना नियमांमध्ये शिथिलता आणल्याने भक्तांनी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करण्याला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. 

दरम्यान गोव्यात आतापर्यंत 58304 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात 256 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 1716 इतकी आहे. विशेष म्हणजे गेल्या चोवीस तासात 104 रुग्ण बारे होऊन घरी गेले आहेत. तर कोरोनाने एकाच मृत्यू झाला आहे. द अवर लेडी ऑफ इम्माक्युलेट कॉन्सेप्ट चर्चमध्ये  दररोज इंग्रजी, कोंकणी आणि पोर्तुगीज भाषेत प्रार्थना केली जाते. 

संबंधित बातम्या