Cyclone Tauktae Impact: गोव्यात आपत्ती व्यवस्थापनाचा पत्ताच नाही

Cyclone Tauktae Impact There is no disaster management in Goa
Cyclone Tauktae Impact There is no disaster management in Goa

पणजी: गोव्यात आपत्ती व्यवस्थापनाचा()disaster management कुठेच पत्ता नाही. नागरिकांना स्वतःहून स्वतःच मदत करावी लागत आहे. मंत्री म्हणून मी सर्वच जणांना एकावेळी मदत करू शकत नाही, हे सारे उद्विग्न करणारे आहे, असे मनोगत ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो(Michael Lobo) ‘गोमन्तक’कडे बोलताना व्यक्त केले. राज्‍यातील(Goa) 90 टक्के भागातील वीजपुरवठा सुरळीत झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आजपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात येत आहे. हा सारा फोलपणा आहे. असे काहीही झालेले नाही. आजही निम्मे कळंगुट अंधारात आहे. पर्यटनाच्या(Tourism) माध्यमातून कळंगुट(Calangute) बागा(Baga) परिसरातून मोठा महसूल सरकारला मिळतो, पण त्याच्या बदल्यात काय मिळाले, याचा हिशेब लावला गेला पाहिजे. वीजवाहिन्या(Power lines) ओढण्यासाठी कामगार नाहीत, त्यामुळे ओव्हरहेड वायर्सद्वारे निदान सिंगल फेज वीजपुरवठा आम्ही सुरू करत आहोत. सगळेचजण विजेसाठी याचना करत आहेत. सरकार(Government) म्हणून त्यांना मदत करू शकत नाही, याचे वाईट वाटते, असेही लोबो म्‍हणाले.(Cyclone Tauktae Impact There is no disaster management in Goa)

आपत्ती व्‍यवस्‍थापन केवळ कागदावरच

ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो म्हणाले, चक्रीवादळ येणार याची आठवडाभर आधी कल्पना सरकारला होती. वादळ आले आणि हानी झाली इथपर्यंत ठिक आहे. वादळातून होणारी हानी टाळता येणार नव्हती, मात्र त्यानंतर सरकारने जनतेला मदत करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक होते. तसे झाल्याचे दिसत नाही. आपत्ती व्यवस्थापन केवळ कागदावर राहिले आहे. वीज खात्याचे सहाय्‍यक अभियंते, कनिष्ठ अभियंते धावाधाव करत आहेत. त्यांच्या काम करण्याविषयी शंका नाही, मात्र त्यांच्याकडे उपकरणे आणि कामगारच नाहीत. येथे असलेले कामगार सरकारने इतरत्र नेले. त्यामुळे वीज खांब उभे करणे, वीज वाहिन्या ओढणे ही कामे करता येत नाहीत. आम्ही सारे जनतेसोबत काम करत असून शक्य तिथून वीजपुरवठा देण्याचा प्रयत्न करत आहोत.

झाडे कापणाऱ्या करवती तोकड्या!
आपत्ती व्यवस्थापनाची तयारी केवळ कागदावर आहे. पडलेली झाडे कापण्यासाठी विद्युत करवती उपलब्ध नाहीत. अशा करवतींची किंमत केवळ दीड लाख रुपयेच असते. प्रत्येक तालुक्यासाठी अशा दोन करवती सरकार का पुरवू शकत नाही. म्हापशातून आणलेल्या करवतीने चार मीटर रुंद वडाचे एक झाड कापण्यास दीड दिवस लागला. नागरिक रस्त्यावर उतरून मदत करत आहेत म्हणून नागरिकांचे कष्ट थोडे कमी झाले आहेत. सारेकाही सरकारी यंत्रणेनेच करावे अशी भूमिका नागरिकांनी घेतली असती तर जनजीवन पूर्वपदावर येण्यास किती वेळ लागला असता हे सांगता आले 
नसते.

अतिरिक्त मनुष्यबळ पुरवण्याची गरज

पारंपरिक मच्छीमारांनाही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आज चौथा दिवस निम्मे कळंगुट अंधारात आहे. दोन अडीचशे वीज खांब मोडले आहेत. असलेल्या खांबावरून केबल आणून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न आहेत. या काळात अतिरिक्त मनुष्यबळ सरकारने पुरवण्याची गरज होती. आपत्ती व्यवस्थापनाची पथके वावरताना दिसली पाहिजे होती. तसे काही होताना दिसत नाही. आपत्ती व्यवस्थापनाचे एकही पथक कळंगुट परिसरात कार्यरत नाही. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे केवळ कागदावरील नियोजन नव्हे हे संबंधितांनी समजून घेतले पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com