"गोव्यातील तृतीयपंथी आणि देहविक्री व्यवसायातील महिलांसाठी लसीकरण मोहिम राबवा"

Vaccination Goa
Vaccination Goa

पणजी: कोविड प्रतिबंधक लसीकरण(Vaccination) मोहिमेत राज्य((Goa government) सरकारने समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचे प्रयत्न केले. पण, ज्यांना कोविड संसर्गाचा धोका अधिक आहे अशा घटकांचा मात्र सरकारला विसर पडला आहे. लसीकरण जनजागृती व कागदपत्रांच्या अभावी, यापूर्वी अॅपमध्ये नोंदणी न करता आल्यामुळे व मोबाईल नसल्यामुळेही गोव्यातील(goa) बहुतेक तृतीयपंथींना(transgender)आणि देहविक्री व्यवसायातील(sex workers) महिलांना(Women) तसेच या व्यवसायातून बाहेर पडलेल्या महिलांना लसीकरणाची(Vaccination) सुविधा अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे अशा घटकांसाठी खास लसीकरण मोहिम राबवण्याची गरज कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.(Demand for vaccination campaign for transgender and prostitution women in goa)

सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने लसीकरण आणि लसीकरण प्रक्रियेची माहिती याबाबत वेगवेगळ्या स्थानिक भाषांतर्गत तृतीयपंथी समुदायाच्या सदस्यांपर्यंत जागरूकता अभियान चालविण्याचे आवाहन केले आहे. हरियाणा आणि आसाम राज्यांत ज्याप्रमाणे तृतीयपंथीयांसाठी खास मोबाईल लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आले होते त्याप्रमाणे इतर राज्यांनेही पावले उचलावीत असेही आवाहनकरण्यात आले होते. पण, राज्य सरकारकडून असे काही प्रयत्न झाले नाही. राज्य सरकारने पुढाकार घेऊन या समूहाच्या वस्त्यांच्या ठिकाणी कॅम्पचे आयोजन करायला हवे, अशी गरज अन्याय रहित जिंदगी (अर्ज) संस्थेच्या ज्युलियाना लोहार यांनी व्यक्त केली.

तृतीयपंथी आणि देहविक्रीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या महिलांचा समुपदेशन ज्युलियाना करतात. समुपदेशन दरम्यान या घटकांतील सदस्यांच्या मनात लसीकरणाबाबत भिती असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्या सांगतात,या घटकांतील काही सदस्य तंबाखू आणि दारू सेवन करतात. लसीकरणानंतर यावर बंदी येईल काय किंवा या पदार्थांचे सेवन करत असल्यामुळे लसीकरणानंतर विपरित परिणाम होईल काय, अशी भीती त्यांना आहे.यातील काही एचआयव्हीग्रस्त आहेत. त्यांची एआरटी थेरपी सुरू आहे. यामुळे आपण लस घेऊ शकतो का किंवा लस घेतल्यावर आरोग्य संबंधित आणखीन अडचणींना सामोरे जावे लागणार का, असे प्रश्न त्यांना पडतात.   

या घटकांतील काही सदस्यांसाठी ओळखपत्र देखिल मोठी समस्या बनली आहे. अर्ज संस्थेशी जोडलेल्या तृतीयपंथी सदस्यांपैकी दोन असे सदस्य आहेत ज्यांचे आधीच्या ओळखीवरून आधार कार्ड बनले आहे. त्यांच्या आधीच्या आधार कार्डवर त्यांची ओळख वेगळ्या लिंगवर नोंद असल्याने लसीकरणानंतर मिळणारे प्रमाणपत्र देखिल याच ओळखीवर त्यांना प्राप्त होणार आहे. यावर लोहार म्हणाल्या, मागील एक वर्षात जे तृतीयपंथी आमच्याशी जोडलेले आहेत त्यातील काही देहविक्री व्यवसायात आहेत तर काही रेल्वेत किंवा बाजारात जाऊन भिक्षा मागणारे आहेत. त्यांची पोटापाण्याची व्यवस्था एकाच ठिकाणी राहून होत नाही. त्यांना भटकंती करावी लागते. अशावेळी प्रमाणपत्र आधीच्या ओळखीवर देण्यात आले तर 
पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीती त्यांच्या मनात आहे. 

 देशात लसीकरणात तृतीयपंथी पिछाडीवर 
2011 च्या जनगणनेनुसार देशात 4. 87 लाख तृतीयपंथी आहेत. अलिकडेच मे महिन्यात केंद्र सरकारने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार कोविड विरोधी लसीकरणात केवळ 24,468 म्हणजे 5.22 टक्के तृतीयपंथींना लस देण्यात आली आहे. याशिवाय लसीकरणासाठी नाव नोंदवण्यासाठी असलेल्या कोव्हिन अॅपवर महिला आणि पुरूष असे वर्गीकरण करण्यात आले आहे पण यात तृतीयपंथी असा उल्लेख देखिल करण्यात आलेला नाही. यावरून तृतीयपंथीकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होते. तृतीयपंथी समुदायातील काहींना कोमोर्बोडिटीज आहे तर काही एचआयव्हीग्रस्त आहेत. कोविडचा धोका यांना अधिक आहे. त्यामुळे यांचे लसीकरण प्राधान्याने होणे गरजेचे आहे. 

लसीकरणानंतर आश्रय गृहात व्यवस्था करणे आवश्यक
देहविक्रीचा व्यवसाय ठप्प झाल्यामुळे सध्या काही अशा महिला आहेत ज्यांच्यावर रस्त्यांवर गुजराण करण्याची वेळ आली आहे. बहुतेक तृतीयपंथी आणि देहविक्री करणाऱ्या महिलांजवळ घरचा भाडा भरण्यासाठी आणि अन्नासाठीही पैसे नाही. त्यामुळे यांच्यासाठी खास लसीकरण मोहिम राबवणे पर्याप्त नाही. लसीकरणानंतर त्यांना त्रास होऊ नये यासाठी कमीतकमी दोन ते तीन दिवस त्यांची व्यवस्था आश्रयगृहात करून त्यांना सकस आहार देण्याची गरज अर्ज संस्थेच्या अरूण पांडे यांनी व्यक्त केली. 

महिला आयोग आणि महिला व बालविकास खात्याला या घटकांचा विसर?
महिलांच्या कल्याणासाठी महिला आयोग आणि महिला व बालविकास विभागाची स्थापना झाली आहे. विविध कारणास्तव राज्यातील बहुतेक तृतीयपंथी स्त्रींना आणि देहविक्री व्यवसायातील महिलांना आणि या व्यवसायातून बाहेर पडलेल्या महिलांना लसीकरणाची सुविधा अद्याप मिळालेली नाही. अशावेळी या घटकांशी जोडलेले स्वयंसेवक आणि गैर सरकारी संस्थेच्या सहाय्याने या घटकाची भेट घेऊन लसीकरण संदर्भात जनजागृती मोहिम राबवणे आणि वैद्यकीय यंत्रणेच्या सहाय्याने यांच्यासाठी खास लसीकरण मोहिम राबवण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आणि महिला कल्याण संबंधित अधिकाऱ्यांनी पावले उचलणे गरजेचे होते. सद्य परिस्थिती पाहून कदाचित यांच्या शब्दकोशातील महिलांच्या गणतीत तृतीयपंथी स्त्री आणि देहविक्री व्यवसायातील महिला येत नाही का, असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com