गोव्यात कोरोनासाठी 'आयुष 64' औषधांचे वितरण

गोव्यात कोरोनासाठी 'आयुष 64' औषधांचे वितरण
NAIK 3.jpg

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) वाढत असताना केंद्रीय आयुष मंत्रालयाने आवश्यक परवानग्या घेऊन कोरोना रुग्णांसाठी 'आयुष 64' औषध (AYUSH 64 drugs) लॉन्च केले आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (Shripad Y. Naik) आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी हे औषध वेगवेगळ्या रुग्णालयांना तसेच कोरोना रुग्णांची सेवा काळजी घेणाऱ्या संस्थाना पणजी येथे वितरीत करण्यात आले आहे. (Distribution of AYUSH 64 drugs for corona in Goa ) 

कोरोनाचा संसर्ग आल्यानंतर आयुष मंत्रालयाकडे वेगवगेळे आयुर्वेदिक फॉर्मुले आले होते. यावर संशोधन आणि चाचण्या केल्यानंतर मंत्रालयाने हे औषध जाहीर करत कोरोना रुग्णांना वितरीत करण्याचे ठरवले आहे. ज्या रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणं असतील त्यांना हे औषध उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन आणि रामदेव बाबा (Ramdev Baba) यांच्यातील वादामुळे कोरोना रुग्णांचे नुकसान होत आहे. मात्र हे औषध कितपत यशस्वी होणार हे येणारा काळच ठरवेल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com