बनावट कागदपत्रे लावून सासष्टी तालुक्यात 13 मालमात्यांची विभागणी, मामलेदाराकडून तक्रार

scam.jpg
scam.jpg

मडगाव: जमिनीला सोन्याचा भाव असलेल्या सासष्टी(Salcete) तालुक्यात बनावट कागदपत्रे लावून जमिनीचे म्युटेशन (Division) केल्याचे 13 प्रकार उघडकीस आले असून आश्चर्याची गोष्ट म्हणजे या तेराही प्रकरणातील मामलेदार कार्यालयातील फाईल्सही गायब झाल्या आहेत. या प्रकरणी सासष्टीचे मामलेदार प्रतापराव गावकर यांनी 13 जणांवर फौजदारी गुन्हा(Crime) नोंद करण्यासाठी फातोर्डा पोलीस(Police) स्थानकात तक्रारी दाखल केल्या आहेत.(Division of 13 properties in Sasasti taluka with forged documents)


दवर्ली, कुडतरी, आणि सा जुझे द आरियाल या भागातील ही प्रकरणे असून सरकारी कर्मचाऱ्यांशी मिलीभगत करून हे कारस्थान रचले असावे अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी मामलेदार गावकर यांच्याशी संपर्क साधला असता, 13 जमीन मालकांनी आपण आपल्या जमिनी कुणाला विकल्या नसतानाही एक चौदाच्या उताऱ्यात त्या जमिनी भलत्याच्याच नावे लावल्या गेल्या आहेत अशी तक्रार केल्यानंतर या  प्रकरणांची सखोल चौकशी केली असता ही सगळी विभागणी बनावट कागदपत्रे दाखवून केली गेल्याचे उघडकीस आल्याने या तक्रारी नोंदविल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, या जमीन व्यवहाराच्या फाईली तपासून पाहण्यासाठी गावकर यांनी आपल्याच कार्यालयात चौकशी केली असता या व्यवहाराच्या फाईल्सही गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याची वर्दी जिल्हाधिकारी रुचिका कटयाल याना दिली असता त्यांनी फौजदारी तक्रार नोंदविण्याचा त्यांना सल्ला दिला.
या संबंधी फातोर्डाचे पोलीस निरीक्षक कपील नायक याना विचारले असता, आपल्याकडे  तक्रारी आल्या आहेत मात्र त्यांचा प्राथमिक तपास चालू आहे अजून कुणावर गुन्हा नोंद केलेला नाही असे त्यांनी सांगितले.


दरम्यान, उघडकीस आलेली ही 13 प्रकरणे केवळ हिमनगाचे टोकच असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून अशा प्रकारे कित्येक  बेकायदेशीर व्यवहार झाले असावेत अशी शंका व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणांची सखोल चौकशी केल्यास कपाटात दडलेले अनेक सांगाडे बाहेर येऊ शकतात असे बोलले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com