नोकरीनिमित्त महाराष्ट्रातून गोव्यात येणाऱ्यांसाठी ई-पास आवश्यक 

दैनिक गोमंतक
रविवार, 25 एप्रिल 2021

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात गोव्यातून सिंधुदुर्गात जाणारा बांदा-सटमटवाडी टोल नाका बंद करण्यात आला. त्याचबरोबर गोव्यातून सिंधुदुर्गात प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना रॅपिड अॅंटीजेन चाचणी ही अनिवार्य करण्यात आली.  

गोवा : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात गोव्यातून सिंधुदुर्गात जाणारा बांदा-सटमटवाडी टोल नाका बंद करण्यात आला. त्याचबरोबर गोव्यातून सिंधुदुर्गात प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना रॅपिड अॅंटीजेन चाचणी ही अनिवार्य करण्यात आली.  चाचणी  केल्यानंतरच प्रत्येक प्रवाशाला प्रवेश देणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने जाहीर केले.  मात्र त्यामुळे सिंधुदुर्गतून गोव्यात दररोज नोकरीसाठी येणाऱ्या नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात दररोज नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या तरुणांना जिल्हा प्रवेश बंदीतून सवलत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे. (E-pass is required for those coming to Goa from Maharashtra for job) 

मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा; राज्यात दोन ऑक्सिजन प्लांटस उभारणार 

या मागणीचा विचार करता पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी नोकरीनिमित्त महाराष्ट्र-गोवा प्रवास करणाऱ्यांना ई-पास देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र- गोवा त्यावेळी झालेल्या चर्चेत या तरुणांना १५ दिवसांचा पास देण्याचे आश्वासन  दिले आहे. महाराष्ट्रातून-गोव्यात नोकरीनिमित्त प्रवास करणाऱ्या १४ हजार तरुण-तरुणींच्या समस्येवर तोडगा निघाला आहे. महाराष्ट्र राज्यसरकारने गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना ई-पास अत्यावश्यक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने या आदेशाची अंमलबजावणी आजपासून केली. 

दरम्यान, गेल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्यसरकारने गोव्यातून महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्यांसाठी गोवा- सिंधुदुर्ग सीमेवर रॅपिड अॅंटीजेन चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला.  चाचणी  केल्यानंतरच प्रत्येकाला प्रवेश देणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र या निर्णयाचा सर्वाधिक फटका नोकरदार तरुणांना बसला. या बाबत बांदाचे  सरपंच अक्रम खान आणि राजन तेली याचे गांभीर्य लक्षात घेत लगेच राजेंद्र दाभाडे यांची भेट घेत परिस्थितीची कल्पना दिली. यावेळी राजेंद्र दाभाडे यांनी महाराष्ट्रातून गोव्यात येणाऱ्या  नोकरदार युवकांना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पंधरा दिवसाचा प्रवासी पास देण्याचे मान्य केले आहे. 

पाच पालिकांच्या मतमोजणीनंतर गोव्यात लॉकडाऊन?

त्याचप्रमाणे, ज्या तरुणांना दररोज नोकरीनिमित्त महाराष्ट्रातून गोव्यात यावे लागते त्यांनी सरपंच अक्रम खान, भाजपचे तालुका उपाध्यक्ष शेखर गावकर माजी नगराध्यक्ष संतोष नानचे व चेतन चव्हाण  यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करण्याचे आवाहन राजन तेली यांनी केले आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासन नाव नोंदणी झालेल्या तरुणांच्या नावाने ई-पास जारी करणार करेल असेही सांगण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या