गोव्यात अंड्यांना आले चांगले दिवस; 80 ते 90 रुपये डझन

गोव्यात अंड्यांना आले चांगले दिवस; 80 ते 90 रुपये डझन
egg goa.jpg

डिचोली: एकाबाजूने ‘कोविड’ (Covid-19) संकटामुळे लागू असलेल्या संचारबंदीमुळे (Curfew) ताज्या मासळीसाठी (Fish) मारामारी निर्माण झाली असतानाच, दुसऱ्याबाजूने बॉयलर अंड्यांना मात्र चांगले दिवस आले आहेत. मासळी मिळणे दुरापास्त झाल्याने बाजारात खवय्यांकडून अंड्यांना मोठी मागणी असल्याने अंड्यांचा भाव आता आणखी वाढला आहे. (Eggs have become more expensive in Goa.)

सध्या अंड्यांच्या दरात प्रति झडनमागे दहा रुपयांनी वाढ झाली आहे. डिचोलीत अंड्यांची आवकही मुबलक प्रमाणात होत असून, घाऊक विक्रेत्यांकडे सध्या अंडी 640 रुपये शंभर नग याप्रमाणे विकण्यात येत आहेत. मागील महिन्यात 540 रुपये 100 नग असे अंड्यांचे दर होते. येत्या एक जूनपासून मासेमारी बंदीकाळात मासळीचा मोठा तुटवडा निर्माण होणार असल्याने, अंड्यांचे दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. तसे संकेतही काही विक्रेत्यांकडून मिळाले आहेत. 
आफ्रिका खंडातून गोव्यात आलेल्या माशांमुळे नद्यांतील जैव संपदा नष्ट होण्याची भीती

अंडी 80 रुपये डझन..!
मागील आठवड्यापर्यंत डिचोलीतील घाऊक विक्रेत्यांकडे 540 रुपयांना 100 नग, तर 70 रु. डझन याप्रमाणे अंड्यांची विक्री होत होती. आता घाऊक विक्रेत्यांकडे 640 रुपयांना 100 नग, तर 80 रु. डझन याप्रमाणे अंड्यांची विक्री होत आहे. तर ग्रामीण भागातील किरकोळ दुकानांतून 90 रुपये डझन याप्रमाणे अंड्यांची विक्री करण्यात येत आहे. मासळीच्या तुटवड्यामुळे अंड्यांना आलेली तेजी पाहता, पुढील आठ दिवसांपर्यंत अंड्यांचे दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. तसे संकेतही काही विक्रेत्यांकडून मिळाले आहेत. ‘कोविड’च्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी लागू करण्यात आलेल्या ‘टाळेबंदी’ काळात मागील वर्षी एप्रिल महिन्यात अंड्यांना भाव आला होता. त्यावेळी मासळीच्या अनुपलब्धतेमुळे बहूतेक मत्स्यप्रेमी अंड्यांवर आपल्या जिभेचे चोचले पुरवत होते. एप्रिल महिन्यात तर मध्यंतरी बाजारात अंडी 80 रुपये डझनपर्यंत पोचली होती. नंतर श्रावण महिन्यात अंड्यांचे दर पूर्वपदापदावर आले होते. आता मासळीच्या तुटवड्यामुळे पुन्हा एकदा अंड्यांना तेजी आली 
आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com