गोव्यातील ‘त्या’ घरात 60 वर्षानंतर विजेचा प्रकाश!

अवित बगळे
बुधवार, 9 जून 2021

एका घरात असा प्रकाश पाडण्यासाठी जास्तीत जास्त खर्च असेल 90 हजार रुपये. मात्र प्रत्येक घरासाठी सरकारने एवढा खर्च करण्यासाठी मुक्तीचे साठावे वर्ष उजाडावे लागले आहे.

पणजी: वस्तीपासून दूरवर बांधण्यात आलेली घरे. गोवा मुक्तीपासून आजवर विजेच्या दिव्यांचा प्रकाश त्या घरात पडलेलाच नाही. एका घरात असा प्रकाश पाडण्यासाठी जास्तीत जास्त खर्च असेल 90 हजार रुपये. मात्र प्रत्येक घरासाठी सरकारने एवढा खर्च करण्यासाठी मुक्तीचे साठावे वर्ष उजाडावे लागले आहे.(Electricity supply to 150 homes in Goa will start on June 14)

सरकारने केलेल्या पाहणीत वीज नसलेली दोन चार नव्हे तर 261 घरे आढळली आहेत. वस्तीपासून दूरवर एका बाजूला असलेल्या या घरांपर्यंत वीज नेण्याचा खर्च परवडणारा नाही, काही ठिकाणी वनक्षेत्र असल्याने अशा विविध कारणांस्तव अंधारालाच सोबती करून या घरातील लोक राहत होते. शहरी भागात विजेचा झगमगाट असला तरी मिळेल, परवडेल त्या प्रकारच्या प्रकाशावर या घरात राहणाऱ्या गोमंतकीय आपले जीवन जगत आहेत.

मॉन्सून म्हणजे पाऊस नव्हे 

अशी केली जाईल व्यवस्था
या घरांत 18 वॅटचा एक, 37 वॅटचे दोन दिवे बसवले जात आहेत. छपरावर दोन पॅनल तर 12 व्होल्टची एक बॅटरी घरात बसवली जात आहे. 9 वॅटची एक ट्युबलाईट, डीसी उर्जेवर चालणारा एक पंखा, मिक्सर लावण्यासाठी आणि उपकरण चार्ज करण्यासाठी दोन सॉकेट घरांत बसवली जात आहेत. याशिवाय सौरउर्जेचे घरात वापरायोग्य उर्जेत रुपांतर करण्याची यंत्रणाही बसवली जात आहे. पाच वर्षे या साऱ्यांची देखभाल दुरुस्तीही कंपनी करणार आहे.

Goa: बावीस कोटींच्या IVERMECTIN प्रकरणात औषध खरेदी समिती बरखास्त 

अन्‌ दिवे पेटले
आता राज्य सरकारने नव्याने स्थापन केलेल्या  नूतन व नूतनीकरणक्षम ऊर्जा खात्याच्या माध्यमातून केंद्रीय व राज्य सरकारच्या योजनांच्या मिश्रणातून गोवा ऊर्जा विकास यंत्रणेकडे हे काम सोपवले आणि घटक राज्य दिनी 5 घरांत वीज पेटली. 14 जून रोजी 150 घरांत वीज देण्याचे काम सुरू होणार आहे. यासाठी या घरांच्या छपरावर सौरऊर्जा निर्मितीचे पॅनल बसवण्यात आले. कन्व्हर्जन्स एनर्जी सर्विसेस लि. या केंद्र सरकारच्या कंपनीला हे काम सोपवण्‍यात आले असून त्यांनी या कामासाठी 66 लाख 13 हजार रुपये खर्च येईल असे सरकारला कळवले आहे.

संबंधित बातम्या