गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळातील रिक्त पदे भरा

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

प्रदूषण नियंत्रण मंडळातील रिक्त पदे येत्या सहा महिन्यात भरण्यात यावीत असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिला आहे.

पणजी: प्रदूषण नियंत्रण मंडळातील रिक्त पदे येत्या सहा महिन्यात भरण्यात यावीत असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिला आहे. लवादाचे अध्यक्ष आदर्श कुमार गोयल यांनी हा आदेश जारी केला आहे. त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे, की पर्यावरण आणि आणि प्रदूषणाचा गुन्हा हा मानवावर केलेल्या हल्ल्या इतकाच गंभीर मानला जावा.

त्याविरोधात कडक कारवाई करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रयोगशाळा अद्ययावत करण्यात यावी. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करण्यात यावे. येत्या सहा महिन्यांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळात रिक्त असलेली सारी पदे भरण्यात यावीत. केेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या सार्‍या प्रक्रियेवर लक्ष ठेवावे आणि राज्य प्रदूषण मंडळाला आवश्यक तेथे सहाय्य करावे. प्रयोगशाळेचे , मनुष्यबळाची उपलब्धता यातून पर्यावरणाचे संरक्षण यावर भर दिला पाहिजे.  या सार्‍यांची जबाबदारी राज्याच्या मुख्य सचिवांवर राहील.

गोवा कार्निव्हल : या फ्लाईट्समध्ये घेता येणार खास गोवन जेवणाचा आस्वाद -

 

देशाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित बातम्या