दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पहिला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

दैनिक गोमंतक
मंगळवार, 4 मे 2021

दक्षिण गोव्यातील जिल्हा इस्पितळात गोवा सरकारचा पहिला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

सासष्टी: कोरोना संसर्गाच्या(Corona  second wave) दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून दिवसेंदिवस सक्रिय रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे भारतात ऑक्सिजनसाठी (oxygen) मागणी वाढली असून गोमंतकीयांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी ‘पीएम केअर निधी’ चा (PM cares fund) वापर करून दक्षिण गोव्यातील जिल्हा इस्पितळात गोवा सरकारचा पहिला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. (First Oxygen Generation Project at South Goa District Hospital)

गोव्यात नाइट पार्ट्या सुरू असल्याने किनारपट्टी भागात ड्रग्ज व्यवसाय जोमात

राज्यातील इस्पितळात ऑक्सिजन (oxygen) प्रणाली कशाप्रकारे चालत आहे याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल राज्यातील सर्व इस्पितळांना भेट दिली, तर याचसंबंधी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाहणी करण्यासाठी आले असता, पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. गोव्याला ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी पीएम केअर निधीचा (PM cares fund) वापर करून हा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला लागणारा कॉम्प्रेसर 8 मेपर्यंत पोहचल्यास15 मे पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. 

भविष्यात गोव्याला किती प्रमाणात ऑक्सिजन लागणार, हा ऑक्सिजन कुठून येणार यासंबंधी ऑक्सिजन उत्पादक प्रकल्प, ऑक्सिजन डिलिंग एजंटकडे चर्चा करण्यात आली आहे. गोव्यातील सर्व खासगी व सरकारी इस्पितळात सुरळीतपणे सध्या ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत असून प्रत्येक इस्पितळात जाऊन पाहणी करण्यात आलेली आहे. गोव्याला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची सरकार दक्षता घेणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. 

ड्रग्ज विक्रेता टायगर मुस्तफा गजाआड; एनसीबी गोवाची कारवाई 

कोरोना महामारी (Corona) नियंत्रणासाठी तरुणांनी सेवेत यावे: मुख्यमंत्री कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढलेली असून इस्पितळात उपचार घेणाऱ्या या रुग्णांना सेवा पुरविण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी कंत्राटी पध्दतीवर भरती करण्यात येत आहे, पण कोरोनामुळे भरती करण्यासाठी अद्याप नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. गोव्यातील तरुणांनी कोरोना महामारी नियंत्रणात ठेवण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर भरती व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. 

 

संबंधित बातम्या