गोव्यात चोवीस तासांत कोरोनाचे चार बळी

दैनिक गोमंतक
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

राज्यात आज चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू झाले. या चार जणांमध्ये केवळ ३४ वर्षे वय असणाऱ्या उसकई येथील व्यक्तीचा समावेश आहे.

पणजी : राज्यात आज चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू झाले. या चार जणांमध्ये केवळ ३४ वर्षे वय असणाऱ्या उसकई येथील व्यक्तीचा समावेश आहे. आज दिवसभरात १२५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर ६१ जण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्यात बाराशे एक्यांशी सक्रिय रुग्ण असून राज्याचा रिकव्हरी रेट ९५.८४ टक्के इतका आहे.  आज ज्यांचा मृत्यू झाला,

त्यांच्यामध्ये सत्तरी येथील ६८ वर्षीय पुरुष, वास्को येथील ५५ वर्षीय पुरुष, उसकई येथील ३४ वर्षीय पुरुष आणि सालसेत येथील ६० वर्षीय  पुरुष यांचा समावेश आहे. यातील दोन व्यक्ती गोवा वैद्यकीय महाविद्यालयात, एक मृत्यू इएसआय इस्पितळात आणि एक मृत्यू वाळपई येथील आरोग्य केंद्रात झाला असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

उत्तर आणि दक्षिण गोव्यातील कोविड इस्पितळांमध्ये उपचारासाठी पुरेशी जागा शिल्लक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यात खाटांची संख्या २७५ इतकी असून सध्या २०८ खाट वापरासाठी उपलब्ध आहेत तर दक्षिण गोव्यात ६० इतकी खाटांची संख्या असून सध्या ४७ खाटा उपलब्ध आहेत.

आणखी वाचा: 

परराज्‍यातून गोव्यात येणाऱ्या प्रत्‍येकाची होणार थर्मल तपासणी - 

संबंधित बातम्या