Goa Politics: गिरीश चोडणकर हे दिल्लीत पक्षांतर्गत बैठकांपासून दूर

girish chodankar congress.jpg
girish chodankar congress.jpg

पणजी: कॉंग्रेसचे राज्य प्रभारी दिनेश गुंडू राव व प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) सोमवारी दिल्लीत आहेत. मात्र ते पक्षांतर्गत बैठकांपासून दूरच राहिले. आपण खासगी दौऱ्यावर दिल्लीत आल्याने मित्र परिवाराच्या गाठीभेटींशिवाय अन्य कोणालाही भेटलो नाही, असे त्यांनी रात्री ‘गोमन्तक’ला सांगितले. (Girish Chodankar is away from party meetings in Delhi)

चोडणकर उद्या दुपारी गोव्यात परतणार आहेत. राव सद्यस्थितीविषयी पक्षश्रेष्ठींना अवगत करण्यासाठी मडगावहूनच दिल्लीला रवाना झाले आहेत. ते विधानसभा पूर्वतयारीचा भाग म्हणून संघटनात्मक फेररचनेविषयी दिल्लीत चर्चा करणार आहेत.

चोडणकर यांच्या नेतृत्वाला सासष्टी तालुक्यातून आव्हान दिले जात असतानाच युवा नेत्यांनी चोडणकर यांच्यामागे ठामपणे राहण्याचे ठरवले आहे. यामुळे नेमका काय निर्णय घ्यावा याविषयी पेच आहे. पक्ष आणखीन एखादा कार्याध्यक्ष नेमून या पेचातून वाट काढण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com