Goa Assembly: कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीवर दिगंबर कामत यांचा बहिष्कार

दैनिक गोमंतक
सोमवार, 3 मे 2021

गोवा विधानसभेच्या आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीवर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी बहिष्कार घालत असल्याचे जाहीर केले आहे.

पणजी: गोवा विधानसभेच्या आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीवर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी बहिष्कार घालत असल्याचे जाहीर केले आहे. वारंवार मागणी करुनही बैठकीची विषय सूची न दिल्याच्या निषेधार्थ आपण हे पाऊल उचलले असल्याचे कामत यांनी स्पष्ट केले आहे. बेजबाबदार भाजप सरकारने  बोलविलेल्या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा करण्यात येणार हे सांगितले जात नाही. 29 एप्रिल रोजी सदर बैठकीची नोटीस मिळाल्यानंतर मी मागणी करुनही विधानसभा सचिवालयाने विषय सूची उपलब्ध न करण्यामागे सरकारचा छुपा हेतू असल्याचे स्पष्ट होत आहे. सरकारच्या जनहित विरोधी व चुकीच्या निर्णयात सहभागी होऊन पापाचा धनी व्हायचा नसल्याने मी आजच्या बैठकिपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे  कामत यांनी म्हटले आहे. (Goa Assembly: Digambar Kamat boycotts the meeting of the Working Advisory Committee)

अपयशाची नैतिक जबाबदारी स्विकारून भाजप सरकारने राजीनामे द्यावे

राज्यातील कोविड परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची व मृतांची संख्या वाढत आहे. गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने आता केवळ रुग्णांना मोफत व वेळेत आरोग्यसेवा देण्याचे कामकाज हाताळावे असा सल्ला मी सरकारला दिला होता कामत यांनी म्हटले आहे. गोवा विधीमंडळ सचिवालयाने गुरूवारी एक सुचना पत्र जारी करुन विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक सोमवारी 3 मे 2021 रोजी संध्याकाळी 4 वाजता बोलविली असल्याचे कळविले होते. 

विधानसभेचे सत्र 19 जुलै 2021 रोजी परत सुरू होणार असल्याचे स्पष्ट असताना, आता अचानक सरकारला कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्याची का गरज भासते हे जाणुन घेणे गरजेचे आहे असे सांगुन सरकारने सर्व आमदारांना त्याची कल्पना द्यावी अशी मागणी मी केली होती, परंतु असंवेदनशील भाजप सरकारने त्यावर काहिच कृती केली नाही. सरकार एकिकडे विरोधी पक्ष व आमदारांचे कोविड हातळणीसाठी सहकार्य मागते व दुसरीकडे आमदारांना विश्वासात न घेता , लपवा छपवी करुन आपला छूपा अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करते हे दुर्देवी आहे असे कामत यांनी म्हटले आहे.

ड्रग्ज विक्रेता टायगर मुस्तफा गजाआड; एनसीबी गोवाची कारवाई 

संबंधित बातम्या