Goa Covid-19 : राज्यातील रिकव्हरी रेट 95.99 टक्क्यांवर

Goa Covid-19 : राज्यातील रिकव्हरी रेट 95.99 टक्क्यांवर
Corona Goa.jpg

पणजी : राज्यात शुक्रवारी (Friday) केवळ 6 बळींची नोंद झाली. दोन महिन्यानंतर एका दिवसांतील हे सर्वात कमी बळी आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना (Covid-19) बऱ्यापैकी नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत कोरोना मृत्यूंची संख्या ही 2975 एवढी आहे. तर आज 34 जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

शुक्रवारी 4020 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यात 315 नवे कोरोना बाधित आढळून आले. दिवसभरात 534 कोरोना बाधित बरे झाले. राज्यात आतापर्यंत 3599 सक्रिय कोरोना  बाधित आहेत. कोरोना रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही 95.99 वर पोचली आहे. 

दरम्यान, करोनामुळे संरक्षित स्मारके आणि संग्रहालये 21 जून पर्यंत बंद राहणार आहेत. यात भारतीय पुरातत्व विभाग (Department of Archeology of India) ,गोवा पुरातत्व विभाग (Goa Archaeological Department) यांच्या अखत्यारीत असलेली सर्व स्मारके, संग्रहालये आणि खाजगी संग्रहालये सुद्धा 21 जून पर्यंत बंद असतील.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com