Goa: कोविड कॉल सेंटरमुळे रूग्णांच्या मनोधैर्यात वाढ

Goa Covid Call Center boosts morale of patients
Goa Covid Call Center boosts morale of patients

पर्वरी: गोवा राज्य सरकारने(Goa state government) बार्देश तालुक्यातील रुग्णांची विचारपूस करण्यासाठी पर्वरी(Porvorim) येथील गोवा क्रिकेट अकादमीच्या(Goa Cricket Academy) इमारतीत कोविड कॉल सेंटर(Covid call center) सुरू केले आहे. या माध्यमातून गृहविगलीकरणात असलेली रुग्णांची(patients) दरदिवशी विचारपूस केली जात आहे. त्यामुळे त्यांना मानसिकदृष्ट्या आधार(morale support) मिळतो व बरे होण्याच्या दृष्टीकोनातून मदत मिळत असल्याचे रुग्‍णांकडून सांगण्यात आले. या कॉल सेंटरमधून आमची विचारपूस केली जाते, हवे नको ते विचारले जाते. त्यामुळे आमचे मनोधैर्य(morale) वाढते, असे रुग्णांनी सांगितले.(Goa Covid Call Center boosts morale of patients)

कोविड रुग्‍णांची दरदिवशी आस्‍थेने विचारपूस 

म्हापसा उपजिल्हाधिकारी कार्यालय मार्फत हे कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये 30 कर्मचारी काम करीत असून त्यांना स्थानिक स्वंयसेवकांची मदत होत आहे. गृहविगलीकरणात असलेली रुग्णांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून स्थापन केलेल्या कॉल सेंटरच्या माध्यमातून दर दिवशी बार्देश तालुक्यातील प्रत्येक रुग्णांची तीनवेळा फोन करून विचारपूस करण्यात येते. त्यांची प्राणवायूची पातळी, ताप, सर्दी व अन्य लक्षणांची विचारपूस केली जाते. तसेच आरोग्यविषयक सुविधा व्यवस्थित मिळतात की नाही, यासंदर्भात विचारणा केली जात आहे. त्यामुळे कोविडबाधित रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

मनोधैर्य वाढल्‍याच्‍या रुग्‍णांकडून प्रतिक्रिया

सध्‍या गृह विगलीकरणाचे रुग्ण घरच्या घरी उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. जर एखाद्या रुग्णाला गंभीर लक्षणे दिसल्यास त्यांना जवळच्या कोविड निर्मूलन केंद्रात दाखल करण्याचा सल्ला दिला जातो, असे डॉ. विकास नाईक यांनी सांगितले. या कोविड कॉल सेंटरमध्‍ये म्हापसा जिल्हाधिकारी मामू हागी व कपिल फडते यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास नाईक (पर्वरी), डॉ. प्रीतम नाईक(हळदोणा), डॉ. रोशन नाझारेथ (कांदोळी), डॉ. साधना शेट्ये (शिवोली), डॉ. शेरल डिसोझा (म्हापसा), डॉ. योगेश गोवेकर (कोलवाळ) हे देखरेख करीत आहेत. सरकारने हे कॉल सेंटर सुरू करून आम्हाला खूप आधार झाला आहे, असे एका रुग्णाने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com