गोवा: पक्षकार्यातील मनमानी कारभारामुळे; फातोर्डा युवक काॅंग्रेसच्या 70 सदस्यांनी दिला राजीनामा

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 19 एप्रिल 2021

काॅंग्रेसच्या नेत्यांनी फातोर्डा मतदारसंघातील पक्षकार्यात मनमानी चालवली असल्याचा आरोप करून फातोर्डा युवक काॅंग्रेस समितीच्या 70 सदस्यांनी राजीनामा दिला आहे.

मडगाव : काॅंग्रेसच्या नेत्यांनी फातोर्डा मतदारसंघातील पक्षकार्यात मनमानी चालवली असल्याचा आरोप करून फातोर्डा युवक काॅंग्रेस समितीच्या 70 सदस्यांनी राजीनामा दिला आहे. फातोर्डा युवक काॅंग्रेस समितीचे अध्यक्ष सुलेमान खान यांनी आज पत्रकार परिषदेत हे जाहीर केले. 

काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते फातोर्डामधील पक्ष कार्यात तसेच कोणताही निर्णय घेताना विश्वासात घेत नसल्याचा आरोप खान यांनी केला. मागच्या दोन विधानसभा निवडणुकीत फातोर्डातील उमेदवार अखेरच्या क्षणी जाहीर करण्यात आला. शेवटच्या क्षणी कुणाला तरी उमेदवार म्हणून लादले जाते व पक्षाची नाचक्की होते. मतदारांसमोर यामुळे युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना नामुष्की सहन करावी लागते, असे खान यांनी सांगितले.(Goa Due to arbitrariness in party work 70 members of Fatorda Youth Congress resign) 

पालिका निवडणुकीत गोवा फाॅरवर्डच्या पॅनलसोबत युती करताना व फातोर्डा काॅंग्रेस गट समितीचे पॅनल स्थापन करतानाही आम्हाला विश्वासात घेण्यात आले नाही. रेश्मा सय्यद या युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्तींने चांगले काम करूनही पक्ष पालिका निवडणुकीत त्यांचया पाठीशी राहिला नाही, अशी खंत खान यांनी व्यक्त केली. 

गोवा: ''महाराष्ट्राने गोवा 'कोविड संवेदनशील' राज्य कोणत्या...

फातोर्डा युवक काॅंग्रेसच्या 70 सदस्यांनी राजीनामा दिला आहे. हे सर्व सदस्य एकत्र आहेत. पुढे काय करायचे याचा सामुहीक निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

काॅंग्रेसवर परिणाम नाही - आशिश कामत 

फातोर्डा युवक काॅंग्रेस समितीच्या 70 जणांनी राजीनामा दिल्याचा दावा करण्यात आला असला तरी त्यामुळे काॅंग्रेसवर काही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया फातोर्डा मतदारसंघाचे काॅंग्रेसचे प्रभारी डाॅ. आशिश कामत यांनी व्यक्त केली. राजीनामा दिलेले 70 जण कोण त्याची नावेही जाहीर करावीत असे कामत यांनी म्हटले आहे. 

संबंधित बातम्या