गोव्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२० पर्यंत दुप्पट करण्याचे सरकारचे ध्येय

Goa Government aims to double farmers income in Goa by 2020
Goa Government aims to double farmers income in Goa by 2020

पणजी : राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२० पर्यंत दुप्पट करण्याचे ध्येय आम्ही समोर ठेवले आहे. त्यासाठी कृषी खाते, पशुसंवर्धन खाते, मत्‍स्‍योद्योग खाते आणि राज्य फलोत्पादन मंडळाने केंद्रिय किनारी कृषी संशोधन संस्था (सीसीएआरआय) सोबत कार्यरत आहे. शेतकऱ्याच्या दुप्पट उत्पन्नाचे ध्येय पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन मार्ग आखणीचे काम आता पूर्ण झाले आहे. या मार्गावरून जात आपल्याला ध्येय गाठायचे आहे. हे ध्येय कोणत्याही एकाचे नव्‍हे, तर चार खात्यांची मदत घेऊन गाठायचे आहे. आपल्या शेतीत पिकणाऱ्या आणि राज्याची विशेष ओळख असणाऱ्या प्रत्येक पिकाला आता राष्ट्रीय पातळीवरील ब्रँड बनविण्यासाठी झटावे लागेल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर हेसुद्धा उपस्थित होते. 

जुने गोवे येथील राष्ट्रीय कृषी अनुसंधान संस्था - सीसीएआयआयच्या इमारतीमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट - २०२० या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. तसेच स्वयंपूर्ण गोवा संकल्पनेला समोर ठेवत ‘व्होकल फॉर लोकल’ असा नारा देण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक एकनाथ चाकूरकर, कृषी खात्याचे नेविल अल्फान्सो आणि वेगवेगळ्या खात्यातील पदाधिकारी उपस्थित होते. 

पूरक उत्‍पादनाला प्रोत्साहन

राज्यातील काजू फेणीला राष्ट्रीय ओळख आहे. तसेच काजूपासून कॅंडी बनविणे, यासारखे यशस्वी उपक्रम राज्यात होत आहेत. राज्यात नारळ आणि काजूचे उत्‍पन्न चांगले होत असल्याने आता आम्ही राष्‍ट्रीय काजू आणि नारळ महामंडळासोबत एकत्रित काम करणार आहोत. याशिवाय शेतकऱ्याला शेतीसोबत दुग्धउत्पादन, मत्‍स्‍योत्पादन यासारखे प्रयोग राज्यात करण्यात येणार आहेत. शेतकऱ्याचे 
वर्षाचे सरासरी उत्पादन जर ६ लाख असेल, तर १२ लाखाच्यापुढे पोहोचेल. यासाठी मार्गदर्शन करणारी टीम तयार करण्यात आली असून मी स्वतः या गोष्टींकडे लक्ष ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
 
शेतकऱ्यांना जोडधंदा

‘सीसीएआरआय’च्या माध्यमातून राज्यात एकात्मिक शेतीची वेगळी ओळख लोकांना करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. तसे प्रयोगसुद्धा आम्ही केले असून अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न यामुळे दुप्पट झाले आहे. सुपारी, नारळ, केळी यासारखी पिके आम्ही संशोधित केलेल्या शेतीच्या माध्यमातून करीत शेतकऱ्यांनी १० लाखाच्या पुढे उत्पन्न घेतले आहे. याशिवाय चांगले मांसांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या प्राण्यांच्या जातीहीसुद्धा ओळख शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून करून देण्यात येणार असल्याची माहिती डॉ चाकूरकर यांनी दिली. 

स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न पूर्ण करू : कवळेकर

आपल्याला सर्वच बाबतीत जर गोव्याला स्वयंपूर्ण बनवायचे असेल, तर शेती हा त्यातील प्रमुख घटक आहे. सीसीएआरआयच्या माध्यमातून करणाऱ्या येणाऱ्या अनेक संशोधनांवर राज्यात यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. शेतकरी हे प्रयोग करण्यासाठी पुढे येत आहेत, हे पाहून आनंद होत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही बाबतीत जर समस्या असतील, तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आपल्या सर्वांना एकत्रित मिळून हे ध्येय गाठायचे असून आता थांबायचे नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी शेतकऱ्यांना दिला.

बाहेरून गाई आणणे थांबवूया 

"राज्याची ओळख असणारी श्वेत कपिला गाय अधिक प्रमाणात दूध देते. असे असूनही आपल्याकडे गाई बाहेरून आणल्या जातात. कपिला गाईचे दूध आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा अतिशय चांगले आहे. त्यामुळे आता आपण आपल्याच राज्यातील प्राण्यांचा वापर करूया. याशिवाय राज्यातील भाताच्या प्रमुख प्रजातींना आम्ही राष्ट्रीय ओळख देण्यासाठी काम करणार."
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न

  •   सरासरी उत्पन्न ९१,०९८ रुपये
  •   शेतीतून १६, ८९३ रुपये 
  •   डेअरीतून १२, २४३ रुपये 
  •  मजुरीतून  ४६,८६५ रुप

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com