गोवा: आयसीजीएस 'सजग' तटरक्षक दलात सामील

sajag 1.jpg
sajag 1.jpg

भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्ड (Goa Shipyard) ने बांधलेल्या अत्याधुनिक गस्ती नौका आयसीजीएस सजग (Sajag) चे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल (Ajit Doval) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आयसीजीएस सजग पश्चिम किनारपट्टीच्या संरक्षणासाठी तटरक्षक दलात दाखल झाली आहे.

पश्चिम किनारपट्टीच्या संरक्षणाबरोबरच गस्त,निगराणी मध्ये महत्वाची भूमिका असणाऱ्या अत्याधुनिक गस्ती नौका आयसीजीएस सजग भारतीय तटरक्षक दलात सामील झाली असून ती गुजरातच्या पोरबंदर (Porbandar) बंदरामध्ये मध्ये तैनात असणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, भारतीय तटरक्षक दलाचे महानिदेशक के. नटराजन , रक्षा सचिव अजयकुमार यांच्या उपस्थितीत हे इ-कमिशनिंग, लोकार्पण समारंभ पार पडला. (Goa ICGS joins Sajag Coast Guard)

अत्याधुनिक आयसीजीएस सजग या जहाजावर छोट्या जलद नौकाही असून हेलिकॉप्टर उतरण्याची सोय आहे. गस्त आणि निगराणीसाठी अत्याधुनिक बोफर्स गण बरोबर लांब पल्ल्याच्या छोट्या बंदुका ही उपलब्ध आहेत. शोध आणि बचाव समुद्री संरक्षण, तेल गळती आणि प्रदूषण रोखण्यासाठी ही नौका पश्चिम किनारपट्टी मध्ये कार्यरत असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com