Goa Lockdown: संचारबंदीत 15 दिवसांसाठी वाढ शक्य

Goa lockdown
Goa lockdown

पणजी: येत्या 31 मे नंतर संचारबंदीत(Lockdown) वाढ होणार का याविषयी उत्सुकता वाढली आहे. केंद्र सरकारने कोविड(COVID-19) आटोक्यात आणण्याच्या निर्बंधात 30 जूनपर्यंत वाढ करावी अशी शिफारस केल्याने जीवनावश्यक यादीत काही गोष्टी वाढवून संचारबंदीत सुरवातीला 15 दिवसांसाठी वाढ केली जाऊ शकते. (Goa lockdown likely to increase for 15 days)

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(Dr pramod sawant) यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, कोविडचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटत आले असले तरी कोविडने मृत्यू पावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अद्यापही चिंताजनक आहे. त्यामुळे संचारबंदीबाबत या साऱ्या गोष्टी लक्षात ठेऊन विचार करावा लागणार आहे. उद्या- परवापर्यंत सरकार याचा निर्णय घेईल.

राज्यांच्या भरपाईसाठी केंद्र घेणार कर्ज

दरम्यान कोरोनावरील उपचारासाठीची वैद्यकीय उपकरणे, औषधे, लस यावरील जीएसटी कपातीवर आज जीएसटी परिषदेमध्ये सहमती झाली असून नेमकी कपात किती असावी हे ठरविण्यासाठी मंत्रिगट नियुक्त केला जाणार आहे. मंत्रिगटाचा अहवाल ८ जूनपर्यंत अहवाल आल्यानंतर करकपातीचा अंतिम निर्णय होईल.  दरम्यान, राज्यांच्या जीएसटी भरपाईसाठी केंद्र सरकार 1.58 लाख कोटीचे कर्ज घेऊन अर्थसहाय्य करेल. मात्र जीएसटी भरपाई उपकर वसुली आणि मुदत यावर निर्णयासाठी जीएसटी परिषदेची स्वतंत्र बोलावली जाणार आहे. 

कोरोना संकटकाळात आज झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी परिषदेत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. मागील साडेसात महिन्यात परिषदेची बैठक झाली नसल्याबद्दल विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना अर्थमंत्री सीतारामन यांनी फेब्रुवारीमधील अर्थसंकल्पी अधिवेशन आणि पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे तेथील अर्थमंत्र्यांच्या सहभागाविना परिषदेची बैठक बोलावणे शक्य नसल्याचे कारण सांगितले. मात्र, आजच्या बैठकीमध्ये कोरोना संकटात सर्वसामान्यांना दिलासा देणारे महत्त्वाचे निर्णय झाल्याचाही दावा त्यांनी केला. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com