Goa Medical College 5178 Sq land was transferred to Panaji Municipal Corporation
Goa Medical College 5178 Sq land was transferred to Panaji Municipal Corporation

जुन्या गोमेकॉ संकुलाचा ताबा महापालिकेकडे सुपूर्द

पणजी: गेल्या काही वर्षांपासून मार्केट इमारतीचा पूर्ण ताबा नसल्याने महापालिकेला दुकानधारकांशी भाडेकरार करता येत नव्हता. आज अखेर पालिका प्रशासनाने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाची ५१७८ चौ. मी. जागा पणजी महापालिकेला हस्तांतर केल्याचे पत्र सुपूर्द केले आहे. ही जागा ताब्यात घेण्यात आल्याचे महापालिका आयुक्त संजीत रॉड्रिग्ज यांनी या पत्रावरच नमूद केले आहे. 


सरकारच्या २० डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोवा वैद्यकीय महाविद्यालय व इस्पितळाकडे असलेली जागा पालिका प्रशासनाला देण्यास संमती देण्यात आली होती, ती देण्यात आली नव्हती. २७ नोव्हेंबर २०२० रोजी गोमेकॉ इस्पितळाचे डीन यांनी ती पालिका प्रशासनाला सुपूर्द केल्यानंतर ती पणजी महापालिकेकडे देण्यात आली आहे. पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेले हस्तांतराच्या कामाला गती आली होती. 


या मार्केटमधील जागेचा ताबा मिळण्यासाठी महापौर उदय मडकईकर, बाजार समितीचे अध्यक्ष शेखर डेगवेकर, आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनी सतत पाठपुरावा केला होता. ही जागा सुपूर्द केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार बाबूश मोन्सेरात, मंत्री जेनिफर मोन्सेरात, मंत्री विश्वजित राणे यांचे महापौर मडकईकर यांनी आभार मानले आहेत.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com