Goa municipal elections 2021: विश्वासा विरुद्ध खोटारडेपणाची लढत: दामू नाईक

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

मडगाव पालिकेची निवडणूक ही विश्वास विरुद्ध खोटारडेपणाची लढत असून या निवडणुकीत विजयी होऊन वायब्रंट मडगाव पॅनलचेच मडगाव पालिकेवर वर्चस्व असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

मडगाव ः गोवा फाॅरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज सकाळी वडील जयवंत सरदेसाई, पत्नी उषा सरदेसाई यंच्या सोबत अंबाजी - फातोर्डा येथील प्रेझेन्टेशन उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मतदान केंद्रात मतदान केले. भविष्यासाठी सज्ज फातोर्डासाठी आपण मतदान केले आहे, असे त्यांनी सांगितले. 

गोवा फाॅरवर्डच्या फातोर्डा फाॅरवर्ड पॅनलची विरोधी पक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या माॅडल मडगाव पॅनलशी युती आहे. मडगाव नागरी युतीच्या बॅनरखाली या दोन्ही पॅनलतर्फे 24 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहेत. 

विश्वास विरुद्ध खोटारडेपणाची लढत - दामू नाईक

फातोर्डाचे माजी आमदार आणि भाजपच्या वायब्रंट मडगाव पॅनलचे अध्यक्ष दामू नाईक यांनी घोगळ येथील श्रीमती पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयातील मतदान केंद्रात मतदान केले. मडगाव पालिकेची निवडणूक ही विश्वास विरुद्ध खोटारडेपणाची लढत असून या निवडणुकीत विजयी होऊन वायब्रंट मडगाव पॅनलचेच मडगाव पालिकेवर वर्चस्व असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Goa Municipal Elections 2021: कोरोना पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का घटणार? 

संबंधित बातम्या