गोवा: मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाची पसरली अफवा

sawant 5.jpg
sawant 5.jpg

पणजी :  गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना दोनापावल येथील मणिपाल इस्पितळात (Manipal Hospital) तपासणीसाठी धाव घेतली अशी खोटी माहिती प्रसारीत झाली आणि त्याची एकच चर्चा समाजमाध्यमांवर रंगली. मुख्यमंत्र्यांनी आज दुपारच्या काही बैठका रद्द केल्याने या माहितीला खतपाणीच मिळाले मात्र मुख्यमंत्र्यांनीच ही माहिती म्हणजे अफवा असल्याचे स्पष्ट केले. (Goa Rumors of CMs illness spread)

मुख्यमंत्री तातडीने मणिपाल इस्पितळात निघून गेले. ते बराच वेळ झाला तरी बाहेर आले नाहीत त्यामुळे ते तपासणीसाठीच गेले असावेत असा अंदाज बांधून कोणीतरी मुख्यमंत्री अत्यवस्थ असल्याचे निदान केले आणि त्यातून मग खोट्या बातमीचा जन्म झाला. समाज माध्यमामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात ती खोटी बातमी पोचली आणि जो तो त्या माहितीच्या शहानिशा करण्याच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीविषयी आणखीन माहिती घेण्याचा प्रयत्न करू लागले. यामुळे समाज माध्यमावर त्याची एकच चर्चा रंगली.

समाज माध्यमावर चर्चाचर्वण सुरु असतानाच दोनापावल येथे गेलेले मुख्यमंत्री आपल्या शासकीय निवासस्थानी परतले तेव्हा त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, एक जवळचा नातेवाईक मणिपालमध्ये दाखल करण्यात आला आहे. त्याची विचारपूस करण्यासाठी तेथे गेलो. सहजपणे चर्चेत 20-25 मिनिटे गेली. तेथे मी माझी कोणतीही तपासणी करून घेतली नाही. त्या नातेवाईकाच्या तब्येती व्यतिरीक्त अन्य चर्चाही केली नाही. निदा मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीविषयी माहिती प्रसारीत करताना मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी किंवा कार्यालयाशी संपर्क साधून खातरजमा करणे गरजेचे होते. अशी खोटी माहिती प्रसारीत झाल्याने जनतेत गैरसमज होतो. यापुढे तरी निदान काळजी घेतली जाईल अशी अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री दोनापावल येथे गेले आणि परतही आले. त्यांनी नंतर बैठकांचे सत्रही सुरु केले तरी प्रसारीत झालेल्या तब्येतीविषयी माहितीची चर्चा मात्र समाज माध्यमांवर सायंकाळी उशिरापर्यंत सुरु राहिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com