भाजपचे गोवा राज्य प्रभारी सी. टी. रवी आज गोव्यात

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

भाजपचे राज्य प्रभारी कर्नाटकचे आमदार सी. टी. रवी हे प्रथमच राज्याच्या दौऱ्यावर उद्या (ता. २२) येणार आहेत. ते पणजीत प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. सुरवातीच्या नियोजनानुसार ते साखळी येथे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात कार्यकर्त्यांशी संवाद साधून नंतर पणजीत येणार होते.

पणजी :  भाजपचे राज्य प्रभारी कर्नाटकचे आमदार सी. टी. रवी हे प्रथमच राज्याच्या दौऱ्यावर उद्या (ता. २२) येणार आहेत. ते पणजीत प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. सुरवातीच्या नियोजनानुसार ते साखळी येथे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात कार्यकर्त्यांशी संवाद साधून नंतर पणजीत येणार होते. मात्र, काही कारणास्तव साखळीतील मार्गदर्शन शिबिर आज स्थगित करण्यात आल्याने ते थेटपणे पणजीतील बैठकीतच सहभागी होणार आहे.

कॉंग्रेसने राज्य प्रभारीपद कर्नाटकाचे आमदार दिनेश गुंडू राव यांच्याकडे सोपवल्यानंतर आता भाजपचे राज्य प्रभारीपदही कर्नाटकाचे आमदार रवी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीसही आहेत. कर्नाटकातील रयत संघ आंदोलनातून रवी यांचे नेतृत्व विकसित झाले आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. १९९३ मध्ये ते भाजपचे प्रदेश चिटणीस बनले, २००४ मध्ये ते आमदार झाले. ते कर्नाटकाचे माजी उच्च शिक्षण मंत्रीही आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले, की रवी हे प्रथमच राज्याच्या दौऱ्यावर येत असल्याने त्यांचे प्रदेश मुख्य कार्यालयात स्वागत करण्यात येईल. तेथेच ते प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. सध्या राज्यभरात भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे सुरु आहेत. त्यापैकी एका ठिकाणी ते भेट देतील असे नियोजन आहे. जिल्हा पंचायत निवडणूक, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे यापुढेही राज्यात वारंवार दौरे होतील असे नियोजन आहे.

अधिक वाचा : 

गोव्याचा आर्थिक मुसंडी मारण्याचा प्रयत्न असणार खडतर

पणजीत काँग्रेस नेत्यांची मध्यरात्री धरपकड!

गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी ; सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन

संबंधित बातम्या