Goa: पेडण्यात एकाच दिवशी कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Goa: पेडण्यात एकाच दिवशी कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Goa Three members of the family died on the same day in Pernem

पेडणे: गोवा(Goa) राज्यात कोरोना महामारीमुळे(Covid-19) अनेकांचे बळी गेले. सरकारी यंत्रणादेखील कोरोना बळींचा आकडा रोखू शकली नाही. कोरोनामुळे अनेक कुटुंबियाचे संसार उद्‍ध्वस्त झाले, तर काहीजणांचे कर्तेच गेल्‍याने आभाळच कोसळले. पेडण्‍यातील माऊसवाडा येथील जमीनदार व पणजी स्‍थायिक झालेले सुस्वभावी अशा एकाच कुटुंबातील बुधवारी तीन जणांचा इस्‍पितळात उपचारादरम्‍यान मृत्यू झाला, तर बारा दिवसांच्‍या कालावधीत एकूण चौघांचा मृत्‍यू झाला.(Goa Three members of the family died on the same day in Pernem)

पत्नीच्या बाराव्या दिवशी काळाने घातला घाला 
पेडण्‍यातील एक जमीनदार कुटुंबातील ज्‍येष्‍ठ महिलेचा बारा दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. तर बाराव्या दिवशीच म्हणजे बुधवारी 19 मे रोजी 86 वर्षीय व्यक्तीचा सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला, तर दुपारी व्यवसायाने डाॕक्टर असलेल्या त्यांच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. संध्याकाळी ज्‍येष्ठ व्यक्तीचे कनिष्ठ बंधू तथा मृत्यू झालेल्या डॉक्टरांचे काका असलेल्‍या 65 वर्षीय व्यक्तीचाही मृत्यू झाला. मृत्यू आलेल्या डाॕक्टरांच्‍या पश्‍चात  पत्नी, एक मुलगी, एक मुलगा व एक बहीण असा परिवार आहे.

मनाला चटका लावणारी घटना!
क्रूर काळाचा आघात झालेले जमीनदार, सुस्वभावी सुसंस्कृत, ऐश्वर्य लाभलेले हे घराणे, जुन्या पद्धतीचे राजवैभव दाखवणारे प्रशस्त असे घर आहे. या घरातील सर्व मंडळी पणजीसह अन्‍य शहरात राहायची. पण, मनाने ते पेडण्यातच असायचे. म्हणूनच गणेश चतुर्थी, पेडणेची पुनाव, दसरा, दिवाळी यासारख्या मोठ्या सणाला या घरची सगळी मंडळी आवर्जून यायची. सण, देवाची पालखी अशा कार्यक्रमांनाही ते आवर्जून यायचे. त्‍यानंतर त्यांचे प्रशस्त असे घर गजबजून जायचे. येथील सगळ्या लोकांशी त्यांचे जवळचे संबंध होते. यातून या घराण्याबद्दल सगळ्यांना ओढ आणि प्रेम होती. अशा या कुटुंबातील सदस्यांना बारा दिवसांच्या आत चारजणांचा मृत्यू यावा, हे तमाम पेडणेवासीयांच्या मनाला दु:ख व क्लेश देणारे आहे. यामुळेच या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com