गोव्यात सध्या कुठल्या ‘स्ट्रेन’चा फैलाव झालाय; ‘एन440के’ की ‘आंध्र प्रदेश स्ट्रेन’?

Has the N440K or Andhra Pradesh strain spread in Goa
Has the N440K or Andhra Pradesh strain spread in Goa

पणजी : कोरोना महामारीच्या वाढत्या फैलावाने सर्वांना चिंतेत टाकलेले असताना आंध्र प्रदेशमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या ‘स्ट्रेन’मुळे(strain) या चिंतेत आणखी भर पडली आहे. ‘एन440के’(N440K) वा ‘आंध्र प्रदेश स्ट्रेन’(Andhra Pradesh) म्हणून ओळखले जाणारे विषाणूचे हे नवे रूप गोव्यातही(Goa) पोहोचून येथे त्याचा फैलाव झालेला आहे का? याचा अभ्यास होण्याची गरज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. (Has the ‘N440K’ or ‘Andhra Pradesh’ strain spread in Goa)

राज्यात कोरोनाच्या बळींमध्ये अचानक जी वाढ झालेली आहे यामागे या नव्या ‘स्ट्रेन’चा हात आहे का हे पडताळून पाहण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. सध्या जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार ‘आंध्र प्रदेश स्ट्रेन’ हा विषाणूच्या आधीच्या स्वरूपापेक्षा 15 पटींनी अधिक संसर्गजन्य असून त्याला शरीरामध्ये वाढण्यासाठी लागणारा कालावधीही कमी आहे. त्यामुळे तीव्र स्वरूपाच्या संसर्गापासून मृत्यू येण्यापर्यंतच्या रुग्णाच्या प्रवासाचा कालावधीही कमी असतो. त्यासाठी एक आठवडादेखील लागत नाही, फक्त काही दिवसांमध्ये ही प्रक्रिया होते, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

जुनेच धोरण ठरतेय मारक!
गोव्यात सध्या कुठल्या ‘स्ट्रेन’चा फैलाव झालेला आहे हे शोधून काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण त्यानुसार ‘कोरोना’ला तोंड देण्याची आपली उपाययोजना आरोग्य अधिकारिणीला बदलता येईल. सध्याच्या घडीला रुग्णांवर जणू डोळे झाकून उपचार केले जात आहेत आणि त्यांना वाचविण्यात घोर अपयश येत आहे. गेल्या वर्षी महामारीने शिखर गाठले असता जे धोरण अवलंबण्यात आले होते तेच सध्याही वापरात आणले जात आहे. देशभरात सध्या जे थैमान माजले आहे त्याला विषाणूची नवी रूपे कारणीभूत असल्याचे स्पष्ट होऊनही आपल्याकडे जुनेच धोरण वापरात आणले जात आहे, अशी खंत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

लक्षणे दिसल्‍यानंतर  दोन दिवसांत मृत्‍यू
सदर बदललेल्या ‘स्ट्रेन’चा गोव्यातही फैलाव झालेला आहे की नाही हे पडताळून पाहण्यासाठी राज्य सरकारने कुठली पावले उचललेली आहेत, असा सवाल वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. गोव्यात काही रुग्ण हे निदान झाल्यानंतर दोन दिवसांत, तर काही रुग्ण त्या विषाणूची लक्षणे वाढल्यानंतर दोन दिवसांत मृत्युमुखी पडण्याचे प्रकार घडलेले आहेत. कोरोनाबाधितांना मृत्यू येण्याचे प्रमाण सध्या वाढले असून त्याकडे नव्या ‘आंध्र प्रदेश स्ट्रेन’शी सांगड घालून पाहिले जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

कुठला स्‍टँड कारणीभूत आहे ते पाहावे?
ज्या व्यक्ती उपचारांसाठी विलंबाने येतात त्यांना वेगाने मृत्यू येत असल्याचे सांगितले जात आहे. पण त्याचबरोबर ही गोष्ट पाहायला हवी की, निदान झाल्यानंतर दोन दिवसांत मृत्यू येण्याचे प्रकारही घडत आहेत. ‘आंध्र प्रदेश स्ट्रेन’च्या संसर्गामुळे हे घडत आहे का की, ‘डबल म्युटंट’, ‘ट्रिपल म्युटंट’ विषाणूच्या संसर्गामुळे हे घडत आहे हे अभ्यासून पाहण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com