गोवाः 'त्या' घटनेमुळे कोलवाळ कारागृहाच्या सुरक्षा यंत्रणेत बदल

दैनिक गोमंतक
मंगळवार, 13 एप्रिल 2021

पणजी: गेल्या वर्षात कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून कैद्यांच्या पलायनाच्या घटनांमुळे सुरक्षाव्यवस्थेसंदर्भात प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते. या घटना वारंवार घडत असल्याने ही सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी कारागृह परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, स्कॅनतर तसेच डीएफएमडी (डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर) या यंत्रसामग्रीसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. गेल्या वर्षांत चार कैद्यांनी पलायन केले. मात्र, त्यापैकी एकाला गजाआड करण्यात आले. अजूनही तिघेजण फरारी असल्याची माहिती या कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी दिली. (That incident led to a change in the security arrangements at Kolwal Prison)

ब्रिटीश महिला पर्यटकावर बलात्कार करणाऱ्या कैद्यास गोव्यात अटक!

या कारागृहामध्ये विविध गुन्ह्यांखाली शिक्षा झालेले तसेच कच्चे कैदी (ज्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला सुरू आहे) असे मिळून सुमारे 548 कैदी कोलवाळ कारागृहात आहेत. कैद्यांच्या पलायनप्रकरणी अनेकदा क्राईम ब्रँचने त्याचा तपास केला असून कारागृहात असलेल्या काही त्रुटी तसेच काही शिफारशी केल्या आहेत. त्या शिफारशींची अंमलबजावणी सुरू आहे. कारागृहातील प्रकाशझोत, टेहळणी मनोरे तसेच असलेली तीन टप्प्यातील सुरक्षाव्यवस्था याबाबत काही शिफारशी करण्यात आल्या आहेत. 

सुरक्षा यंत्रणेत बदल
प्रत्येकवेळी कैद्याने पलायन केल्यावर त्याचे खापर सुरक्षाव्यवस्था एकमेकांवर फोडते. सुरक्षेसाठी तुरुंग रक्षक, गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाचे सुरक्षारक्षक व आयआरबीची पोलिस यंत्रणा असते. अनेकदा कैद्याच्या या पलायनासाठी अंतर्गत सुरक्षा यंत्रणाही सामील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता या सुरक्षा यंत्रणेमध्ये बदल करण्यात येणार असून ड्युटीवर कोण कोठे असेल त्याचा थांगपत्ता अगोदर कोणालाही लागणार नाही, याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे काही कैदी व सुरक्षा कर्मचाऱ्यांचे असलेले लागेबांधे तोडण्यात येणार आहे. 
 
कैद्यांबरोबर सुरक्षारक्षकांचे लागेबांधे?
कारागृहात अचानक भेट देऊन केलेल्या पाहणीवेळी कैद्यांच्या खोल्यांमध्ये मोबाईल्स सापडण्याचे प्रकार सर्रास आढळून येत आहे. मात्र सापडलेले मोबाईल कारागृहात पोहचतात कसे? यापासून सुरवात होते. जप्त करण्यात आलेल्या या मोबाईलची सखोल चौकशी केली जात नाही. सध्या कारागृहात स्कॅनर तसेच डीएफएमडी यासारखी तपासणी यंत्रणा नादुरुस्त आहे. त्याचा फायदा हे कैदी उठवितात किंवा सुरक्षारक्षकांचेही त्यांच्याशी लागेबांधे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारागृहातून कैदी पलायनप्रकरणीचा तपास करताना क्राईम ब्रँचने सीसी टीव्ही कॅमेराचा डीव्हीआर नेला होता मात्र तो सध्या नादुरुस्त स्थितीत आहे. त्यामुळे कारागृहाची घडी बसविण्याचा प्रयत्न सुरू करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

गोवाः आमठाणे धरण पर्यटकांसाठी ठरतय धोकादायक

कोलवाळ कारागृहामध्ये यापूर्वी कैद्यांना जेवण देताना भेदभाव केला जात होता. त्यामध्ये समानता आणण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व कैदी एकसारखे असल्याने त्यांना एकाच प्रकारची वागणूक देण्याच्या सूचना कारागृह अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कैद्यांना कामामध्ये व्यस्त ठेवण्यासाठी त्यांना विविध कामे दिली जातात. त्यासाठी त्यांना दरदिवशी 80 रुपये रोजगार मिळतो. कारागृहामध्ये असलेल्या कँटिनमधून ते स्वतःसाठी हव्या असलेल्या खाद्यपदार्थ व इतर वस्तू खरेदी करू शकतात. कैद्यांमध्ये सुधारणा आणणे हे खात्याचे ध्येय आहे.
-वेनेन्सिओ फुर्तादो, कारागृह महानिरीक्षक 
 

संबंधित बातम्या