डिचोली, साखळीत दोन दिवस अनियमित पाणीपुरवठा

water supply bicholim
water supply bicholim

पणजी : डिचोली(bicholim) परिसरात 33 केव्हीची भूमिगत वीज वाहिनी(power supply) नादुरुस्त झाल्यामुळे या परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. डिचोली मतदारसंघासह मये व साखळी मतदारसंघातील काही भाग, त्याचबरोबर सत्तरी तालुक्यातील काही भाग आणि चोडण पंचायत क्षेत्राचा काही भागातील लोकांना या समस्येला सामोरं जाव लागत आहे. या परिसरामध्ये आज आणि उद्या  मर्यादित पाणी पुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सरकारला सहकार्य करावे असे आवाहन  सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.(Irregular water supply in bicholim and Sanquelim)  

दरम्यान गेले दोन दिवस या भागात दिवसभरात दहा ते पंधरा वेळा वीज जा ये
करण्याचे प्रकार साखळी व होंडा परिसरात घडत आहेत. आणि त्यामुळे पाण्याचा पुरवठा गेले दोन दिवस अनियमित सुरू आहे. त्यातच आज पुन्हा 33 केव्हीची भूमिगत वीज वाहिनी नादुरुस्त झाल्यामुळे पुन्हा पुढील दोन दिवस पाण्याचा अनियमित पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागणार आहेत.

दरम्यान आज दुपारपर्यंत डिचोली नदीच्या पाण्याची पातळी 2.4 मीटरपेक्षा अधिक तर वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी दिड मीटर पेक्षा अधिक वर आली होती. पावसामुळे डिचोली भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. बहूतेक भागातील वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला. दिवसभर आकाशात पूर्णत: ढगाळ होते. त्याचबरोबर कोसळधार पावसामुळे आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आहे. पावसाचा जोर वाढला असला, तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com