गोवन महिलेनं वाचवलं मैनेला; फोटो व्हायरल

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 12 एप्रिल 2021

ध्वनी प्रदूषणामुळे पक्ष्यांची घरटे नष्ट होतात, परंतु गोव्यातील एक महिला आपल्या नैसर्गिक जगात सूक्ष्म जीवांना सुरक्षित जागा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करीत आहे. 

गोवा: वाढत्या शहरीकरणांमुळे, बदलत्या जीवन शैलीमुळे, जंगलतोडीमुळे आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या  ध्वनी प्रदूषणामुळे पक्ष्यांची घरटे नष्ट होतात, परंतु गोव्यातील एक महिला आपल्या नैसर्गिक जगात सूक्ष्म जीवांना सुरक्षित जागा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करीत आहे. 

निसर्गातील नाजूक पिल्लांचे नव्या जिवांचे रक्षण करण्यासाठी ओळखल्या जाणारे मनीष हरिप्रसाद यानी गोव्यातील मासेमारी करणाऱ्या एका महिलेचे काही फोटो शुक्रवारी आपल्या ट्विटरवरुन शेअर केले आहेत. या फोटोमध्ये एका वृद्ध स्त्रीच्या डोक्यावर एक मैना बसलेली आपल्याला दिसत आहे. दुसर्‍या फोटोत तीने त्या मैनेला आपल्या हातावर अलगद उचलून धरले आहे, त्यानंतर हा  काळा-पांढरा रंगाचा पक्षी तिच्या हातातून उडतांना दिसतो. या फोटोत एक गोष्ट अत्यंत विलोभनिय आहे आणि ती म्हणजे ते पक्षी त्या वृद्ध महिलेला घाबरत नाही, तिच्या अंगाखांद्यावर खेळतांना दिसत आहे. त्या महिलेसोबत आरामदायी जिवन जगतांना हा पक्षी दिसत आहे.

तुमचा कचरा घरातच ठेवा, कोरोना रुग्णाला सोसायटीची ताकिद; दक्षिण गोव्यातील धक्कादायक प्रकार 

"गोव्यातील मासेमारी करणाऱ्या गावातली ही महिला घरट्यांमधून खाली पडणाऱ्या पिल्लांचा जीव वाचविते. जेव्हा ती त्या पक्षांना हळूवारपणे हाका मारते तेव्हा तो क्षण हृदययाला भिडणारा असतो," असे कॅप्शन पक्षीप्रेमी मनीष हरिप्रसाद यांनी या फोटोला दिले आहे.

हे ट्विट 700 हून अधिक ट्विटर वापरकर्त्यांनी लाइक केले आहे आणि हे ट्विट 100 वेळा रीट्वीट केले गेले आहे. ट्वीटवरुन दिलेल्या प्रतिक्रियाांपैकी एकाने सांगितले की ती महिला प्रेरणास्थान आहे. एक अद्भुत प्रिय, आणि हृदयस्पर्शी कथा. म्हणत एका युजर्सने त्या वृद्ध स्त्रीला भेटायची इच्छा व्यक्त केली आहे.
ती किती प्रेरणादायक आहे. मला वृद्ध झाल्यावर तिच्यासारखेच व्हायचे आहे. अशी भावनीक सहानुभूती एका शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या महिलेने व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या