लक्ष्मण पै यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 18 मार्च 2021

गोमंतकियांचा अभिमान असलेले गोव्यातील ज्येष्ठ कलाकार पद्मभूषण लक्ष्मण पै यांचे निधन 14 मार्च रोजी झाले.

गोमंतकियांचा अभिमान असलेले गोव्यातील ज्येष्ठ कलाकार पद्मभूषण लक्ष्मण पै यांचे निधन 14 मार्च रोजी झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरीच लक्ष्मण पै यांची प्राणज्योत मालवली. लक्ष्मण पै हे एक प्रसिद्ध चित्रकार होते, तसेच कलाक्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे.  लक्ष्मण पै यांना पदमभूषण, पदमश्री तसेच नेहरू पुरस्कार आणि ललित कला अकादमी पुरस्कार या महत्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित आले होते. 

Goa Budget 2021: गोवा सरकार 24 मार्च ला अर्थसंकल्प मांडण्यात आणि अधिवेशनात तो...

लक्ष्मण पै यांच्यावर आज गोव्यातील मडगाव येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे उपस्थित होते. तसेच यावेळी दिगंबर कामत यांनी लक्ष्मण पै यांना आदरांजली वाहिली.   

लक्ष्मण पै यांचा जन्म 21 जानेवारी 1926 रोजी गोव्यातील मडगाव मध्ये झाला होता. कला विषयाचे शिक्षण त्यांनी मुंबईतील जे.जे. स्कुल ऑफ आर्टस् मधून घेतले. चित्रकलेच्या आवडीमुळे ते थेट फ्रान्स मध्ये चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी गेले होते. चित्रकला क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे असून, त्यांच्या चित्रांची प्रदर्शने  देशभरात भरवली जात होती. चित्रकला क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानाला सन्मानित करण्यासाठी भारत सरकारने 1945 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. तर तब्ब्ल ३ वेळा ललित कला अकादमी पुरस्कार मिळणारे ते एकमेव ज्येष्ठ चित्रकार होते. पुढे भारत सरकारने त्यांना पदमभूषण पुरस्काराने सुद्धा सन्मानित केले होते.

 

संबंधित बातम्या