मडगाव: मडगाव पालिका निवडणूकीसाठी 30 उमेदवारी अर्ज 

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 6 एप्रिल 2021

मडगाव पालिका निवडणूकीसाठी आज अर्ज भरण्याचा पाचव्या दिवशी 28 उमेदवारांनी 30 अर्ज सादर केले.

सासष्टी : मडगाव पालिका निवडणूकीसाठी आज अर्ज भरण्याचा पाचव्या दिवशी 28 उमेदवारांनी 30 अर्ज सादर केले. उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 8 एप्रिल हा शेवट दिवस असणार आहे. आज अर्ज भरणाऱ्या उमेदवारांमध्ये माजी नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा, माजी नगरसेविका लिवरामेंत बारेटो यांचा समावेश आहे.  (Madgaon 30 nominations for Madgaon municipal elections)

गोवा: आमदार अपात्रता प्रकरणी 20 एप्रिलला होणार निवाडा

आज अर्ज भरलेले उमेदवार पुढीलप्रमाणे: 

प्रभाग 1 मधून ज्योकीम फर्नांडिस, रेंझिल मास्कारेन्हस , प्रभाग 2 कालिदास नाईक, वासूदेव विर्डीकर, प्रभाग 3 ऑल्वीन फर्नांडिस, फातिमा बारेटो, प्रभाग 4 पुष्पा विर्डीकर, प्रभाग 6 योगेश नागवेकर, विराज नाईक, प्रभाग 7 आर्थुर ़डिसिल्वा, प्रभाग 8 कामिल बर्रेटो, लिवरामेंत बर्रेटो, प्रभाग 9 रोशल फर्नांडिस, आगुस्तीन मिरांडा, विन्सेन्ट परेरा, प्रभाग 10 वासूदेव कुंडईकर, रजत कामत, प्रभाग 11अन्वर सईद, प्रभाग 13 अॅड. स्नेहल ओंस्कर, शुभांगी सुतार, प्रभाग 15 उदय देसाई, प्रभाग 17 देविका कारापुरकर राधिका कारापुरकर, प्रभाग 20 पोमा केरकर, प्रभाग 24 राजेंद्र बांदेकर, सत्यन नाईक गावकर, अदिष उसगावकर आणि प्रभाग 25 मधून अपुर्वा तांडेल. 

संबंधित बातम्या