दाबोळी विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाची मोठी कारवाई

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

किंमत 21 लाख 78 हजार 474 होत आहे.

दाबोळी: दाबोळी विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाने केलेल्या कारवाईत 512 ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या बिस्किट हस्तगत केल्या. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत 21 लाख 78 हजार 474 होत आहे. कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त वाय. बी. सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत हैदराबाद येथून इंडिगो फ्लाइट (6ई6913) मधून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांकडून सदर सोने जप्त केले. या प्रवासाकडे अधिक चौकशी केली असता सोने कोची विमानतळावर एका आंतरराष्ट्रीय प्रवास तस्करी केलेले सोने आणले होते, ते हैदराबाद गोवा येथे देशांतर्गत उड्डाण केले जाईल याच इर्शेने त्याने ते सोने विमानातच सोडले होते. (Major action of air intelligence department at Daboli airport)

मूळ पश्चिम बंगालमधील रहिवासी असलेल्या गोव्यासाठी विमानाने प्रवास करताना त्याने हे सोने उचलले. मात्र दाबोळी विमानतळावर उतरताच गोवा डीआरआय अधिकाऱ्यासह गोवा कस्टमने त्याला अटक केली.  त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सदर सोन्याच्या बिस्किट्स सापडल्या तसेच विविध नावे असलेली चार आधारकार्डे आढळली. त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास प्रक्रिया सुरू आहे.

गोवा बनावटीची दारू जप्त; मुंबई-गोवा हावेवर सर्वात मोठी कारवाई

संबंधित बातम्या