पणजीत होणाऱ्या कार्निव्हल मिरवणुकीत महापालिकेचा चित्ररथ नाही - उदय मडकईकर

प्रतिनिधी
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

कोरोना नियमावलीचे पालन करूनच यंदाचा कार्निव्हल आयोजित करण्यात येणार असून कार्निव्हल पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था करताना सुरक्षीत अंतर ठेऊनच ती केली जाणार आहे.

पणजी - फेब्रुवारी रोजी पणजीत होणाऱ्या कार्निव्हल मिरवणुकीत यंदा महापालिकेचा चित्ररथ असणार नाही. महापौर उदaय मडकईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महपालिकेच्या कार्निव्हल मिरवणूक समितीने पणजी कार्निव्हलची तयारी सुरू केली आहे. दिवजा सर्कल ते कला अकादमी अशी दयानंद बांदोडकर मार्गाने ही मिरवणूक निघणार आहे.  पणजी कार्निव्हल मिरवणुकीमध्ये दरवर्षी महापालिकेचा चित्ररथ इतर चित्ररथासह सहभागी  होत होता. मात्र, यंदा तो असणार नाही.  विविध खासगी संस्थांनी तथा पथकांनी पणजी कार्निव्हलमध्ये सहभागी होण्यास होकार दिलेला आहे. चित्ररथ व लोकनृत्य पथके या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती मडकईकर यांनी यावेळी  दिली.

खाणकाम बंदी आदेशाचा होणार फेरविचार; सर्वांच्‍या नजरा सर्वोच्च न्‍यायालयाकडे

कोरोना नियमावलीचे पालन करूनच यंदाचा कार्निव्हल आयोजित करण्यात येणार असून कार्निव्हल पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था करताना सुरक्षीत अंतर ठेऊनच ती केली जाणार आहे. तसेच कार्निव्हलमध्ये सहभागी होणाऱ्यांनी कोरोना नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येणार असल्याचे महापौर मडकईकर यांनी सांगितले.

'आयएनएस विराट' मोडीत काढण्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

‘बाबूश सांगतील ते करणार’
पणजी महापालिका निवडणूक आम्ही आमदार व आमचे नेते बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहोत. त्यांनी मला उमेदवारी दिली किंवा आपल्या मुलाला दिली तरी चालेल. नाही दिली तरी मन्सेरात ज्यांना सांगतील त्यांना पाठिंबा देऊन विजयी करणार आहे, अशी प्रतिक्रिया महापालिका निवडणुकीबाबत विचारले असता महापौर उदय मडकईकर यांनी दिली.

संबंधित बातम्या