गोव्यात प्रवेशसाठी आता पाळीव प्राण्यांकडे देखील लस घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक 

pet animal
pet animal

पणजी: गोवा(GOA) राज्य हे रेबीज-नियंत्रित(Rabies) झाले आहे. रेबीज-नियंत्रित राज्य म्हणून राज्याला दर्जा प्राप्त झाल्याने पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा संचालनालयाने(Department Of Animal Husbandry & Veterinary Services) आता राज्याच्या सीमेवरून कोरोनासह इतर कुठलाही व्हायरस(vires) राज्यात प्रवेश होणार नाही याची काळजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी गोव्याला असंख्य पर्यटक(Tourist) भेट देत असतात येताना ते आपल्यासोबत अनेक लोक आपले पाळीव(Pet animals) प्राण्यांना देखील घेऊन येतात. परंतु आता ज्या लोकांना आपले पाळीव प्राणी घेऊन राज्यात यायचे असेल तर त्या प्रण्यांना देखील लस(Vaccination) दिल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. पशुसंवर्धन आणि पशुचिकित्सा विभाग म्हणजेच एएचव्हीएस विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.  (Now animals  also need to have a certificate of vaccination for entry into Goa)

याबाबत बोलताना एएचव्हीएसचे उपसंचालक डॉ. मर्विन लोपेस म्हणाले, “गोव्यात प्रवेश करताना पर्यटकांनी हॉटलाईनवर कॉल करून त्यांच्या पाळीव प्राण्यांची माहिती आणि लसीकरणाचा तपशील विभागाला देणे गरजेचे आहे. जर त्यांच्या पाळीव प्राण्यांना लस दिली गेली नसेल तर आम्ही विनाशुल्क लसीकरणाची व्यवस्था करू." गोव्यात प्रवेश करताना  कुत्री आणि मांजरी यांना रेबीज लस टोचणे आवश्यक आहे.

गोव्यातील प्रत्येक पाळीव प्राण्याच्या मालकास जनावरांचे लसीकरण करणे  अनिवार्य आहे. मात्र लोकांनी जर त्यांचे लसीकरण केले नाही तर याविषयी त्या लोकांना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चौकशीला सामोरे जावे लागेल असा आदेश पशुसंवर्धन आणि पशुचिकित्सा विभागने काढला आहे. राज्यात सध्या मोठा प्रमाणात कुत्र्यामध्ये रेबीजची लक्षणे दिसून येत आहेत. याचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 

याआधी 2014 मध्ये या रेबीजमुळे राज्यात 17 लोकांचा मृत्यू झाला होता. पुढे मिशन रेबीजने संपूर्ण गोव्यातील कुत्र्यांचे लसीकरण आणि निर्जंतुकीकरण केल्यानंतर या प्रकरणांमध्ये घट झाली आहे. आता त्याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
 

https://www.dainikgomantak.com/goa/goa-conservation-traditonal-sources-water-important-14861

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com