गोव्यात जमीन खरेदीवर सरसकट 3 टक्के नोंदणी शुल्क आकारण्यास विरोध

Opposition to 3 per cent registration fee on land purchase in Goa
Opposition to 3 per cent registration fee on land purchase in Goa

मडगाव - मालमत्ता खरेदी कायद्यात बदल करून नवीन मालमत्ता खरेदीवर मूळ किंमतीची सरसकट 3 टक्के रक्कम नोंदणी शुल्क (Registration fee) म्हणून आकारायचा जो निर्णय घेतला आहे.  त्या निर्णयाला (Decision) विरोध होऊ लागला आहे. यामुळे येथील गरिबांना फटका आणि श्रीमंतांना बक्षीस दिल्यासारखे ते होईल असा दावा करण्यात येत आहे. (Opposition to 3 per cent registration fee on land purchase in Goa)

मडगावच्या कारे कायदा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेने कायदा मंत्री निलेश काब्राल यांची भेट घेऊन त्यांना या संबंधी निवेदन केले आहे. या नवीन बदलामुळे साधा फ्लॅट घेऊ पाहणाऱ्यांना एक टक्का अधिक भुर्दंड बसेल असा दावा त्यांनी केला. या संघटनेचे अध्यक्ष ऍड. प्रसाद नाईक यांच्यासह ऍड. संजीत देसाई तसेच ऍड. हरीश प्रभु देसाई यांचा समावेश होता.

या पूर्वी 50 लाख रुपयांपर्यंत मालमत्ता  खरेदीसाठी 2 मूळ  किंमतीच्या 2 टक्के, 75 लाखापर्यंतच्या मालमत्ता खरेदीसाठी अडीज टक्के, 1 कोटी पर्यंतच्या खरेदीसाठी  3 टक्के, तर 1 कोटींच्या वर खरेदीसाठी साडेतीन टक्के रक्कम नोंदणी शुल्क म्हणून आकारले जात होते. मात्र त्यात बदल करून सर्वांसाठी सरसकट 3 टक्के रक्कम नोंदणी शुल्क केले आहे. याशिवाय ही सारी रक्कम खरेदी करार करतानाच भरायची आहे.

याबद्दल बोलताना ऍड. नाईक म्हणाले, या बदलामुळे एक साधा फ्लॅट खरेदी करणाऱ्याला गरजेशिवाय 1 टक्क्याचा भुर्दंड बसणार असून कोट्यवधीची मालमत्ता  खरेदी करणाऱ्यांना अर्ध्या टक्क्यांची बक्षिसी दिल्यासारखे ते होईल. याशिवाय कमी खर्चात घर खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने जी आवास योजना जारी केली आहे. 

तीसुद्धा फसणार आहे असे ते म्हणाले. हे नोंदणी शुल्क पूर्वी मालमत्ता खरेदीपत्र करतांना भरायची होती. पण नव्या बदलाप्रमाणे ती आता करारपत्र तयार करतांनाच भरायची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या कुठल्याही बांधकामाचे करारपत्र झाले आणि उद्या कदाचित ते बांधकाम बांधलेच गेले नाही तर खरेदीदाराचे पैसे त्यामुळे पाण्यात जातील असे ऍड. नाईक यांनी सांगितले. त्यामुळे हा कायदा रद्द करून जुना कायदाच अमलात आणावा अशी मागणी आम्ही कायदा मंत्र्यांकडे केली आहे असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com