गोवा काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

काँग्रेस पक्षाची राज्यात संघटनात्मक बांधणी करण्यासाठी एक कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे, अशी माहिती काँग्रेसच्या समन्वय समितीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री ॲड रमाकांत खलप यांनी येथे दिली.

पणजी: काँग्रेस पक्षाची राज्यात संघटनात्मक बांधणी करण्यासाठी एक कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे, अशी माहिती काँग्रेसच्या समन्वय समितीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री ॲड रमाकांत खलप यांनी येथे दिली. काँग्रेसचे राज्य प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्या अध्यक्षतेखाली या समन्वय समितीची बैठक आज कॉंग्रेस भवनात झाली. या बैठकीनंतर अॅड खलप यांनी ही माहिती देताना सांगितले, की समन्वय समिती आणि काँग्रेसची प्रदेश समिती एकत्रितरित्या आज सायंकाळी बसून या कार्यक्रमाला अंतिम रूप देणार आहे.

काँग्रेसची प्रदेश समिती, जिल्हा समित्या आणि गट समित्या मिळून कालबद्ध पद्धतीने संघटनात्मक बांधणी राज्यभरात करणार आहेत. याचा एक निश्चित आराखडा आजच्या बैठकीत ठरवण्यात आलेला आहे. त्या आराखड्यानुसार अस पक्षाची पुढील वाटचाल होणार आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या पालिका निवडणुकांबाबत पक्षाची प्रदेश समिती आणि विधिमंडळ गट एकत्रित बसून धोरणात्मक निर्णय घेतील.

Goa Budget 2021: शेती-समुद्र या घटकांवर गोव्याची अर्थव्यवस्था टिकणार -

संबंधित बातम्या