''भाजपकडूनच पर्रीकरांची विकासदृष्टी धुळीस!''

manish sisodiya at goa
manish sisodiya at goa

पणजी: माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांची गोव्याच्या विकासाबद्दल असलेली दृष्टी भाजप सरकारने धुळीस मिळवली आहे. त्यांची ही  दृष्टी पूर्ण करण्याची क्षमता आम आदमी पक्षात आहे. पर्रीकर यांच्या दृष्टीबाबत सहानुभूती असलेल्यांनी आम आदमी पक्षात सहभागी होण्याचे आवाहन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज पणजीत पक्षाच्या कार्यकर्ता संमेलनात बोलताना केले. गोव्यातील जनता भाजप व काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराला कंटाळलेली आहे. त्यांना विसरण्यास लागली आहे. त्यांना पर्याय हवा आहे, त्यासाठी ‘आप’ कार्यकर्त्यांनी पुढील 5-6 महिने मेहनत करून लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा. (Parrikar's development vision was tarnished by BJP)

लोकांमध्ये ‘आप’च्या दिल्ली मॉडेल गोव्यातही आणण्याबाबत विश्‍वास संपादन करून पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा 2022 निवडणुकीसाठीची जोरदार तयारीला लागा, असे आवाहन उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी केले. गेल्या काही महिन्यांत ‘आप’ने गोव्यातील कानाकोपऱ्यात पक्षाची भूमिका पोचवत चांगली घडी बसविण्यास सुरू केली आहे. त्यामुळे बाणावली जिल्हा पंचायत निवडणुकीत आपचा उमेदवार निवडून आला. तसेच नावेलीमध्ये उमेदवाराने सुमारे अडीच हजाराच्या आसपास मते मिळवली. जिल्हा पंचायत निवडणुकीत ‘आप’ने 15 टक्के मते मिळवली ही चांगली सुरवात आहे. काहीजण इतर पक्षात आहेत, ते सुद्धा ‘आप’मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, असे मत सिसोदिया यांनी व्यक्त केले.
  
पणजी परिषद केंद्रात कार्यकर्ता संमेलन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चाळीसही मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर ‘आप’चे गोवा निमंत्रक राहुल म्हांबरे, प्रवक्ते ॲड. सुरेल तिळवे, ॲड. प्रतिमा कुतिन्हो, कॅप्टन बॅन्सी व्हिएगश तसेच वाल्मीकी नाईक उपस्थित होते. 


समई प्रज्वलनाने संमेलनाचे उद्‍घाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री मनिषा सिसोदिया यांचे शाल तसेच समई भेटवस्तू देऊन म्हांबरे यांनी स्वागत केले. शेळ - मेळावली येथे आयआयटी प्रकल्पाविरोधी आंदोलन यशस्वीपणे हाताळणारे शुभम शिवलकर व तसेच इतर काहीजणांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला त्यांचे सिसोदिया यांनी स्वागत केले. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पुढे म्हणाले, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे गोव्याच्या विकासाबाबत असलेली दृष्टी भाजप सरकारने ‘दफन’ करून टाकली आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com