गोवा फाॅरवर्डच्या फातोर्डा गटाध्यक्षपदी पीटर फर्नांडिस

Peter Fernandes as Fatorda Group President of Goa Forward
Peter Fernandes as Fatorda Group President of Goa Forward

मडगाव : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फातोर्डा राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. फातोर्ड्यात बऱ्याच नाट्यमय राजकीय घटना घडत असताना गोवा फाॅरवर्डने फातोर्डा गट समितीची पुनरर्चना केली असून या समितीच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक पीटर फर्नांडिस यांची नियुक्ती केली आहे. 

गोवा फाॅरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज फर्ऩांडिस यांच्या नियुक्तीचा आदेश काढला. गोवा फाॅरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी फर्नांडिस या आदेशाचे पत्र फर्ऩांडिस यांच्या सुपूर्द केले. (Peter Fernandes as Fatorda Group President of Goa Forward)

गोवा फाॅरवर्डच्या फातोर्डा गटाध्यक्षपदी सुजय लोटलीकर कार्यरत होते. त्यांच्या पत्नी श्वेता लोटलीकर या गोवा फाॅरवर्डच्या फातोर्डा फाॅरवर्ड पॅनलच्या प्रभाग 5 च्या उमेदवार आहेत. फातोर्ड्यात गेले काही दिवस घडत असेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लोटलीकर यांच्या जागी आज पीटर फर्नांडिस यांना गटाध्यक्षपदी नेमण्याचा निर्णय सरदेसाई यांनी घेतला.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com