अखेर गोवाच्या किनारी पर्यटकांवर पोलिसांची कारवाई सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 31 मार्च 2021

गोव्यातील किनाऱ्यावर मास्क न वापरता वावरणार्‍या पर्यटकांवर अखेर पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे.

पणजी: गोव्यातील किनाऱ्यावर मास्क न वापरता वावरणार्‍या पर्यटकांवर अखेर पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवली होती. त्यांनी मास्कचे वितरणही पर्यटकांना केले होते. मात्र असे करूनही पर्यटकांनी मास्क वापरणे सुरू न केल्याने गेल्या दोन दिवसापासून पोलिसांनी पर्यटकांवरही कारवाई सुरू केली आहे.

Goa Corona Update: गोव्यात दिलासा देणारी बाब: कोरोना संसर्गित रुग्णापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त 

गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास दोनशे रुपयांचा दंड आकारला जातो. पोलिसांची ही मोहीम गेले तीन महिने अधून-मधून सुरू होती. त्यातून लाखो रुपयांचा दंड पोलिसांनी किनारी भागातच जमा केलेला आहे. पोलिसांनी आता शहरी भागाकडे ही मोर्चा वळवला आहे. राजधानी पणजी शहरात येणाऱ्या मार्गांवर सकाळपासून पोलीस उभे असून मास्क परिधान न करता येणाऱ्यांवर ते जागच्याजागी दंडात्मक कारवाई करत आहेत.

Goa Police Recruitment 2021: या विभागात 1057 पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू 

संबंधित बातम्या