फोंडा आणि पर्वरीत रुग्णसंख्येने गाठला उच्चांक!

goa corona.jpg
goa corona.jpg

फोंडा: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सर्वत्र धास्ती व्यक्त केली जात असतानाच फोंडा तालुक्‍यातही कोरोनाचे रुग्ण कमालीचे वाढत आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा तीनशेच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या शनिवारी फोंड्यात एकाचा मृत्यू झाला होता, तर आज (बुधवारी) आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. (Ponda and Porvorim corona reached the highest number of patients.)

सरकारी आकडेवारीनुसार खुद्द फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात सक्रीय कोरोना रुग्ण संख्या 217 वर पोहोचली आहे, हा आकडा काल 192 वर होता. मडकई, बेतकी खांडोळा तसेच शिरोड्यातील कोविड तपासणी केंद्रांच्या अहवालानुसार कोरोना रुग्ण संख्या तीनशेच्या जवळ पोहोचली आहे. 
फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात एकाच दिवशी पंचवीस कोरोना रुग्ण सापडले आहेत. शिरोड्यातही कोरोना रुग्णांची संख्या सीमित होती, ती आता वाढीस लागली असून बारा रुग्णांची भर त्यात पडली आहे. फोंड्याजवळील धारबांदोडा आरोग्य केंद्रातही कोरोना रुग्ण संख्या वाढीस लागली असून तेथेही पंचविशी पार केली आहे. फोंड्यातील कोरोना (Corona) रुग्णांवर फोंडा (Ponda)  मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. फोंडा शहराबरोबरच कुर्टी, दुर्गाभाट, बेतोडा, बोरी, शिरोडा, खांडेपार, उसगाव, कवळे, रामनाथी, मडकई, प्रियोळ, केरी, बाणस्तारी, माशेल व इतर भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.

पर्वरीत कोरोनाग्रस्तांची संख्या २७३ 
पर्वरी परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. त्यासाठी येथील ग्रामस्थांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कळविण्यात आले आहे. तसेच पर्वरी पोलिस निरीक्षक निनाद देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात नाक्या नाक्यावर मास्क न घालता वावरणाऱ्यांविरोधात सामाजिक अंतर न पाळणाऱ्याना दंड आकारत आहेत. आज एका दिवसात पर्वरी परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण सापडले. आता ही संख्या २७३ वर पोहोचली आहे. येथील ‘मॉल दि गोवा’त कोणतेच निर्बंध पाळले जात नाहीत. प्रत्येक नागरिकांनी घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, दुकानात गर्दी करू नये, तसेच सामाजिक अंतर राखून व्यवहार करावेत, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई तीव्र केली असून फोंडा बसस्थानक तसेच बाजार भागातील ग्राहक व विक्रेत्यांना दंड आकारले आहेत. मात्र ही कारवाई सातत्याने आणि प्रभावीपणे राबवण्याची आवश्‍यकता असल्याचे नागरिकांनी सांगितले. 

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com