पेडणे तालुक्यात आजपासून सहा दिवस वीजपुरवठा खंडित 

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

महत्त्‍वाच्या दुरुस्तीसाठी पेडणे तालुक्यातील विविध भागात आजपासून ६ मेपर्यंत सकाळी 9.30 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येणार आहे.

पेडणे : महत्त्‍वाच्या दुरुस्तीसाठी पेडणे तालुक्यातील विविध भागात आजपासून ६ मेपर्यंत सकाळी 9.30 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येणार आहे. शुक्रवार 30 एप्रिल रोजी विर्नोडा व धारगळ ग्रामपंचायत क्षेत्र, तर सोमवार 3 मे रोजी तांबोसे ग्रामपंचायत क्षेत्रातील नाईकवाडा, सक्राळ व फकिरपाटो परिसरात वीजपुरवठा खंडित राहील. 

साखळी नगरपालिकेवर पुन्हा एकदा सगलानी गटाचे वर्चस्व 

मंगळवार 4 मे रोजी तुये ग्रामपंचायत क्षेत्रात, तर बुधवार 5 मे रोजी चांदेल हसापूर ग्रामपंचायत क्षेत्रातील बैलपार, हणखणे व हेदूस या परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाईल. गुरूवार 6 मे रोजी हरमल ग्रामपंचायत, पालये ग्रामपंचायत व केरी ग्रामपंचायत क्षेत्रात वीज पुरवठा खंडित राहील.

आधीच गोव्यात पाच दिवसाचे लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. अशातच  गोव्यातील पेडणे तालुक्यातील विविध भागात सलग सहा दिवस विजपुरवठा  खंडीत करण्याक येणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात गोयेंकरांना गरमीचा सामना करावा लागणार आहे.

गोयेंकरांनो सरकारी कामासाठी लॉकडाऊन नंतर या 

संबंधित बातम्या