‘गोव्यात बीफचा पुरवठा बंद करू नये’

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

कर्नाटकातून आयात होणारे बीफ बंद करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमव यांनी केली आहे. 

मडगाव: कर्नाटकातून आयात होणारे बीफ बंद करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमव यांनी केली आहे. ख्रिश्चन व मुस्लीम समाजाच्या आहारत बीफ हा महत्त्वाचा घटक असून, सर्व धर्मियांना आपल्या पसंतीनुसार खाण्याचे स्वातंत्र्य आहे. यात सरकारने मतभेद करू नये व गोव्यातील शांतता बिघडवू नये अशी मागणी आलेमाव यांनी वार्का येथे पत्रकार परिषदेत केली. यावेळी गोवा मुस्लीम मंचचे अध्यक्ष शेख इफ्तिकार, साबीर बेपारी व मतीन करोल उपस्थित होते. 

कर्नाटकातून येणारे बीफ बंद झाल्यास गोव्यातील कत्तलखान्यात दरदिवशी २०० गुरांची कत्तल करण्याची तयारी ठेवावी. अल्पसंख्याक बीफपासून वंचित होऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. गोव्यात बीफ बंद होण्यास आपण देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना या विषयाची जाणीव असून त्यांनी बीफ संदर्भात वक्तव्य केलेले आहे, असेही त्यांनी सांगितले. ख्रिसमसचा सण व पर्यटन हंगाम असल्याने गोव्यात बीफची गरज आहे. या प्रसंगी बीफचा पुरवठा बंद होणे दुर्दैवी आहे, असे शेख इफ्तिकार यांनी सांगितले. 

आणखी वाचा:

गोव्यामध्ये ऐन सणासुदीच्या काळात बीफचा तुटवडा होऊ देणार नाही ; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन -

संबंधित बातम्या