Mucormycosis: म्युकरमायकोसिस साठी गोव्यात विशेष बेडची सुविधा

Blackfungus.jpg
Blackfungus.jpg

पणजी: राज्यात कोरोना संसर्गासह काळ्या बुरशीचा (ब्लॅक फंगस) आजार झालेले रुग्ण आढळून आल्याने या रुग्णांसाठीच वेगळा 20 खाटांचा विशेष वॉर्ड सुरू करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त कोरोनाची तिसरी लाट मुलांना लक्ष्य करणारी असल्याचे तर्क काढण्यात आल्याने त्याची तयारी म्हणून बालरोग वॉर्डामध्ये 60 आयसीयू खाटा लवकरच उपलब्ध करण्याचे काम सुरू झाले आहे. या खाटांची संख्या 100 पर्यंत वाढविता येणे शक्य आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी फेसबुकवरून दिली आहे. (Special bed facility for Mucormycosis in Goa)

मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या कोविड लाटेच्या कोणत्याही प्रकारच्या किचकट आजाराला सामोरे जाण्यासाठी साधनसुविधा तयार ठेवण्यात येत आहे. सध्याच्या काळात गरज असलेला ‘एमआयसीयू’ सुविधा सुपसस्पेशिलिटी ब्लॉक इस्पितळात सुरू करण्याचे नियोजन इतर कामांबरोबर सुरू करण्यात आले आहे.

इस्पितळातील सर्व कर्मचारी कोरोनाग्रस्त रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत व कोविड इस्पितळातील कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू रोखण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. इस्पितळातील कोरोनाग्रस्त रुग्णांना उत्तमोत्तम उपचार. प्रोफायलॅक्सीस उपचार देऊन या संसर्गाचा फटका बसू नये यासाठी सरकार सर्व ते प्रयत्न करत आहे असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com