Goa Politics: सुरेंद्र फुर्तादो यांची पणजीतून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा

surendra furtado.jpg
surendra furtado.jpg

पणजी: पणजीचे (Panjim) माजी महापौर (Ex Mayor) सुरेंद्र फुर्तादो यांनी विधानसभेची येती निवडणूक (Assembly Election) पणजी मतदार संघातून लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या ते काँग्रेस पक्षात आहेत. पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात हे काँग्रेसमध्ये असताना त्यांनी फुर्तादो यांना महापौर बनण्याची संधी दिली होती. (surendra furtado wants to contest Assembly elections from Panaji)

महापालिकेच्या मागच्या निवडणुकीत फुर्तादो यांनी मोन्सेरात गटापासून फारकत घेतली होती व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या समवेत एक आघाडी करून महापालिकेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सुरेंद्र फुर्तादो व त्यांच्या पत्नी रूथ फुर्तादो या विजयी झाल्या आहेत. काँग्रेस पक्षाने पणजी मतदारसंघातून मोन्सेरात यांना तुल्यबळ अशा उमेदवाराचा शोध सुरू केला असतानाच फुर्तादो यांनी आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे.

पणजी मतदारसंघात काँग्रेसची पारंपारिक अशी साडेपाच हजार मते आहेत. त्या मतांना फुर्तादो यांच्या मित्रमंडळींची साथ मिळाली तर फुर्तादो यांचा विधानसभेपर्यंतचा मार्ग सुकर होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com