भाजप सरकारची केंद्र आणि राज्यातील लसीकरण मोहीम फसली

Vaccination campaign of BJP government at Center and Goa stalled
Vaccination campaign of BJP government at Center and Goa stalled

पणजी: दूरदृष्टीचा आणि सुयोग्य नियोजन याचा अभाव असल्यामुळेच केंद्र आणि राज्यातील भाजप(BJP) सरकारची लसीकरण मोहीम फसली असल्याची जोरदार टीका गोवा प्रदेश महिला काँग्रेस(Goa women congress party) अध्यक्ष बीना नाईक(bina naik) यांनी केली आहे.

सरकारच्या अपयशाचा पाढा वाचताना नाईक म्हणाल्या, गोव्यासारख्या (Goa)छोट्या राज्यात 1 मे पासून सुरू करण्यात येणारे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण तयारी अभावी थांबवावे लागले आहे. दुसरी बाब म्हणजे सरकारने आधीच लसीकरण केंद्रे अपुऱ्या प्रमाणात सुरू केली आणि नगरपालिका निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली बंदही ठेवली गेली. हे करताना लोकांना मात्र काहीही कल्पना दिली नाही. तिसरे महत्त्वाचे म्हणजे लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सरकारने काहीही केले नाही. लसीकरणाबाबत जनतेत जागृती न झाल्याने कोविडमुळे होणारे मृत्यू वाढत आहेत.

गोवा प्रदेश महिला काँग्रेस सरकारवर अनाठायी टीका करत नसून याआधी मुख्यमंत्री डाॕ. प्रमोद सावंत(pramod sawant) यांना कोविड संकटाबाबत सावध करणारी दोन निवेदने दिली होती. त्यात गोव्याच्या सीमा बंद करणे व बाहेरून येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोविड चाचणी चेकनाक्यावर अत्यावश्यक करणे, बंद पडलेली खासगी इस्पितळे उपयोगात आणणे, घटप्रभा येथे गेलेल्या सुमारे 150 गोमंतकीय परिचारिकांना कोविड रूग्णांसाठी पाचारण करणे, लसीकरणासाठी खासगी इस्पितळे अव्वाच्या सव्वा दर आकारत आहेत त्यावर नियंत्रण आणून कमीत कमी करणे, पणजी मनपा, नगरपालिकांचे नगरसेवक तसेच जिल्हा पंचायत व ग्रामपंचायत सदस्य यांना आपापल्या प्रभागातील लोकांचे लसीकरण करून घेण्याच्या मोहीमेत सामील करून घेणे, गोमेकाॕ व सरकारी इस्पितळातील डाॕक्टरांवर अतिरिक्त ताण न वाढविणे, सर्व माध्यमातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर घोषित करून त्यांचे प्राधान्याने लसीकरण करणे अशा अनेक मागण्या केल्या होत्या.

सरकारने आपल्या दिरंगाईच्या धोरणात तत्काळ बदल करून अनेक समस्यांचा सामना करत असलेल्या लोकांना कोविडच्या काळात चिंतामूक्त करण्यासाठी त्वरीत पावले उचलावी, अशी मागणी बीना नाईक यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com