डिचोलीतील भाजी मार्केटात अखेर व्यवहार सुरु

bicholim market.jpg
bicholim market.jpg

डिचोली: मागील जवळपास दिड महिन्यांपासून बंद असलेले शहरातील फळ-भाजी मार्केट (Fruit And Vegetable Market) अखेर आजपासून (सोमवारी)  सुरु झाले आहे. मार्केट सुरु झाले असले, तरी आज काही विक्रेत्यांनी मार्केटात येण्याचे टाळले. त्यातच भाजीपाल्याचाही काही प्रमाणात तुटवडा जाणवत होता. तरी बुधवारपर्यंत सर्व विक्रेते या मार्केटात फळ-भाजी विक्रीचा व्यवसाय सुरु करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. बेळगावमधील भाजी मार्केट बंद असल्याने भाजीपाल्यांची आयात घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचा तुडवडा आहे. असे एक भाजी विक्रेते सुनिल पाटील यांनी सांगितले. भाजीपाल्याची आवक पूर्वपदावर आली, की आपण मार्केटात व्यवसाय सुरु करणार, असेही त्यांनी सांगितले. (Vegetable market in Bicholim has finally started trading)

मागील मे महिन्याच्या सुरवातीस डिचोली (Bicholim) पालिकेतर्फे कडक 'टाळेबंदी' (Lockdown) जाहीर केल्यानंतर चार दिवस पूर्ण मार्केट बंद होते. त्यानंतर लगेचच राज्यस्तरीय संचारबंदी सुरु झाली. तेव्हापासून कालपर्यंत बाजार संकुलातील भाजी मार्केट बंद होते. नाही म्हटले तरी, संचारबंदी काळात ठराविक वेळेसाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास मुभा आहे. त्यानुसार संचारबंदी लागू झाली, त्यावेळी सुरवातीस हे भाजी मार्केट चालू ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र या मार्केटात गर्दी उसळू लागल्याने पालिकेने दोनच दिवसांनी  हे मार्केट बंद करून आतिल फळ आणि भाजी विक्रेत्यांना बाजाराबाहेर बसण्यास संगितले. 

विक्रेत्यांवर परिणाम नाही

बाजार संकुलातील फळ-भाजी मार्केट बंद करताच बहूतेक विक्रेत्यांनी शहरातील अन्य ठिकाणी बसून आपला व्यवसाय सुरु केला. काहींनी तर वाहनांतून भाजी आणि फळे विक्री सुरु केली. त्यामुळे या विक्रेत्यांच्या व्यवसायावर विशेष परिणाम झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. भाजी मार्केट बंद राहिल्याने बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नियमित ग्राहकांची मात्र गैरसोय झाली. 'टाळेबंदी'मुळे मागील वर्षीही जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे मार्केट बंद होते. त्यावेळीही मार्केटमधील विक्रेत्यांनी बाजाराबाहेर आपला व्यवसाय केला होता. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com