"...तर मुख्यमंत्रीही कोल्हापूरातूनच आणा’’
Vijai Sardesai said If you are bringing a driver from Kolhapur then bring the Chief Minister from Kolhapur

"...तर मुख्यमंत्रीही कोल्हापूरातूनच आणा’’

पणजी : ऑक्सिजनच्या (Oxygen) अभावामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या बाबतीत विरोधी पक्ष गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काल रात्री गोवा मेडिकल कॉलेजमध्ये (Goa Medical College And Hospital) 8 जणांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा दावा विजय सरदेसाई यांनी केला आहे. (Vijai Sardesai said If you are bringing a driver for an oxygen tanker from Kolhapur then bring the Chief Minister from Kolhapur)

गेल्या 5 दिवसात गोवा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावामुळे 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सरदेसाई म्हणतात की,  गोवा राज्याचे 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारने अर्थसंकल्पात 300 कोटींचा विशेष सहाय्यता निधी जाहीर केला. ज्याचा उत्सव राज्य सरकारनेही सुरू केला होता. परंतु या उत्सवांसाठी 300 कोटी मिळू शकतात, तर कोविड काळात केंद्र सरकारने गोव्यास मदत का केली नाही असा प्रश्न सरदेसाईंनी उपस्थित केला आहे.

राज्याचे भाजपा सरकार आणि मुख्यमंत्री कोरोनाचा किती गंभीररीत्या विचार करत आहेत? विचार केला तर उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच गोव्यात कडक कर्फ्यू लागू करावा लागला यावरून यावरून अंदाज येऊ शकतो की राज्य सरकार लॉकडाउन संदर्भात कोणतेही पाऊल उचलण्याच्या बाजूने नव्हते. असा आरोप विजय सरदेसाई यांनी केला आहे.

दरम्यान गोवा सरकारने नव्याने 8 तज्ज्ञ ट्रॅक्टरचालकांची कोल्हापूर येथून व्यवस्था केली आहे. पाच चालक आज दुपारी आले असून ते कामाला लागले आहेत, तर दोघेजण आज संध्याकाळी उशिरापर्यंत पोहचणार आहेत. हे चालक खोर्ली येथून प्राणवायू सिलिंडरची ट्रॉली चालवून गोमेकॉ इस्पितळापर्यंत आणण्याचे काम करणार आहेत. ऑक्सिजन टॅंकरसाठी प्रशिक्षित ड्रायव्हर जर कोल्हापूरमधून आणावे लागत असतील तर राज्याचा मुख्यमंत्रीही कुल्हापुरातूनच आणावा, अशी खोचक टीका यावेळी विजय सरदेसाईंनी केली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com