महाराष्ट्रासारखाच गोव्यातही होणार महाविकास आघाडीचा प्रयोग ?

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

गोव्यातील विधानसभा निवडणूक जवळ आल्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसने ही सक्रिय होण्याचे ठरवले आहे.

पणजी : गोव्यातील विधानसभा निवडणूक जवळ आल्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसने ही सक्रिय होण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सतीश नारीयाणी यांनी आज दिल्लीत पक्षाध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन संघटनात्मक बाबींवर चर्चा केली. पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि स्वतः शरद पवार यांनी गोव्याचे दौरे केले आहेत. पवार यांचे गेल्या महिन्याभरात दोन वेळा गोवा दौरे झाले आहेत. या दौऱ्यामुळे महाराष्ट्रासारखी विरोधी पक्षांची आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस गोव्यात प्रत्यक्षात आणेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

यावर्षीच्या गोवा मुक्तिदिनापूर्वी गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्याचा मानस

प्रफुल्ल पटेल यांनी तसे स्पष्ट संकेतही दिले आहेत. समविचारी पक्षांबरोबर निवडणूकपूर्व आघाडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे असे त्यांनी याआधीच सांगितले आहे. शरद पवार यांनीही भाजप विरोधातील मतांची विभागणी होऊ नये यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केलेली आहे. या साऱ्यांमुळे विधानसभेच्या येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावेल असे मानले जात आहे. 

गोवा कार्निवल: कार्निवल निमित्त पणजी महानगरपालिकेकडून दहा हजार मास्कचे मोफत वितरण

भाजपची गोव्यात सत्ता येण्याअगोदरच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होती. नारीयाणी यांनी दिल्लीत पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी युवक कांग्रेस गोव्यामध्ये कशी बळकट करता येईल याविषयी त्यांचे मार्गदर्शन घेतले. पवार यांनी युवकांच्या समस्या हाती घेऊन तालुकावार कार्यक्रम निश्चित करून कामाला लागा असा आदेश त्यांना दिलेला आहे. नारीयाणी  यांनी सुप्रिया सुळे यांच्याशीही युवकांच्या गोव्यातील समस्यांविषयी चर्चा केले. सध्या गोव्याच्या विधानसभेत चर्चिल आलेमाव हे एकमेव आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.

संबंधित बातम्या